भाविकांचा टेम्पो उलटून दोन जण जागीच ठार
By Admin | Updated: April 4, 2017 23:25 IST2017-04-04T23:22:30+5:302017-04-04T23:25:52+5:30
जाफराबाद : भाविकांचा टेंपो लोखंडा ते नायदेवी या फाट्याजवळ उलटून सावरखेडा गोंधन येथील सविता राजेंद्र वायाळ (५५) व नामदेव शंकर वायाळ (६०) हे जागीच ठार झाले

भाविकांचा टेम्पो उलटून दोन जण जागीच ठार
जाफराबाद : शेगाव येथील संत श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या सावरखेडा गोंधन येथील भाविकांचा टेंपो लोखंडा ते नायदेवी या फाट्याजवळ उलटून झालेल्या भीषण अपघातात सावरखेडा गोंधन येथील सविता राजेंद्र वायाळ (५५) व नामदेव शंकर वायाळ (६०) हे जागीच ठार झाले. तर २७ जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.
मृतांवर मंगळवारी सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे जाफराबाद तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रामनवमी उत्साह हा शेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे दरवर्षीच्या नित्यनियमाप्रमाणे यावर्षी ३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास टेंपो सावरखेडा गोधन येथून शेगावकडे निघाला होता. खामगाव मुख्य रस्यावरील लोखंडा ते नायदेवी या फाटी जवळ चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो उलटला. हा अपघात एवढा भीषण होता की यात दोनजण जागीच ठार झाले.
सविता राजेंद्र वायाळ व नामदेव शंकर वायाळ हे गंभीर जख्मी होऊन जागीच ठार झाले आहेत. तर अन्य २७ जण जख्मी झाले आहेत.
त्यांना उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रु ग्णालयामध्ये रात्री
उशिरा दाखल करण्यात आले
आहे.
शेगाव येथे रामनवमीनिमित्त जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जखमींवर खामगाव येथील शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. (वार्ताहर)