चोरट्यांनी फोडली मंदिराची दानपेटी

By Admin | Updated: July 13, 2014 00:28 IST2014-07-12T23:46:38+5:302014-07-13T00:28:44+5:30

मन्नास पिंपरी/गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील माझोड शिवारातील रेणुकामाता मंदिर संस्थानमध्ये ११ जुलैच्या रात्री चोरी झाली.

The temple's treasury busted by thieves | चोरट्यांनी फोडली मंदिराची दानपेटी

चोरट्यांनी फोडली मंदिराची दानपेटी

मन्नास पिंपरी/गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील माझोड शिवारातील रेणुकामाता मंदिर संस्थानमध्ये ११ जुलैच्या रात्री चोरी झाली. चोरट्यांनी दानपेटी फोडून अंदाजे १० हजार रूपये पळविल्याचे सांगण्यात येत असले तरी याप्रकरणी ग्रामस्थांकडून तक्रार देण्यात आलेली नसल्याने पोलीस आपली जबाबदारी झटकत आहेत.
माझोड गावच्या पश्चिमेस काही अंतरावर माळावर रेणुकामाता संस्थानचे मंदिर आहे. त्या ठिकाणी सध्या कोणीही राहत नाही. केवळ दिवसभर पहारेकरी असतात. शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडली. ही दानपेटी मागील तीन महिन्यापासून उघडण्यात आली नव्हती. त्यामुळे दानपेटीत अंदाजे १० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी पोलिसांत तक्रार दिलेली नाही;परंतु माहिती मिळाल्यावर सपोनि राजमोहन जाधव, जमादार टी.एस. गुव्हाडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
यासंदर्भात गोरेगावचे सपोनि जाधव यांना विचारले असता त्यांनी चोरीच्या प्रकारास दुजोरा दिला. (वार्ताहर)

Web Title: The temple's treasury busted by thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.