तापमानाचा पारा पुन्हा ४२ अंशांवर

By Admin | Updated: May 15, 2016 00:05 IST2016-05-14T23:58:27+5:302016-05-15T00:05:23+5:30

औरंगाबाद : शहरात मागील आठवडाभरात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानात कमालीची घट झाली होती. त्यामुळे असह्य उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना मोठा दिलासा मिळला

Temperature humidity is again at 42 degrees | तापमानाचा पारा पुन्हा ४२ अंशांवर

तापमानाचा पारा पुन्हा ४२ अंशांवर

औरंगाबाद : शहरात मागील आठवडाभरात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानात कमालीची घट झाली होती. त्यामुळे असह्य उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना मोठा दिलासा मिळला; परंतु पुन्हा एकदा सूर्याने आग ओकणे सुरू केले असून, शनिवारी तापमान ४२ अंशांवर गेले. दिवसभर प्रचंड उकाडा जाणवल्याने शहरवासीय चांगलेच घामाघूम झाले.
तापमानातील वाढीने मार्च आणि एप्रिल महिन्यांत शहरवासीयांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागला.
गेल्या आठवडाभरात शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यातच ९ मे रोजी जिल्ह्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहरातही विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला . त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. या दिवशी शहराचे तापमान ३७.९ अंश नोंदविल्या गेले. पावसामुळे तापमानात घट झाल्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून मुक्तता झाली होती. त्यामुळे कूलर, पंखे बंद ठेवण्यावर भर दिला जात होता. परंतु पुन्हा एकदा तापमानात वाढ होण्यास प्रारंभ झाला आहे.

शहरातील तापमान १२ मे रोजी ४०.६ अंश नोंदविल्या गेले होते. अवघ्या दोन दिवसांतच तापमानाने उसळी घेतली आहे. शहरातील तापमानाने शनिवारी पुन्हा ४२ अंश सेल्शिअसचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे उन्हाच्या काहिलीचा त्रास शहरवासीयांना सहन करावा लागत आहे.
2प्रचंड उकाड्याला नागरिकांना सामोेरे जावे लागत असून, सकाळपासूनच सूर्याच्या प्रकोपाची तीव्रता सायंकाळी उशिरापर्यंत जाणवत आहे. उन्हाच्या चटक्याने आबालवृद्ध हैराण होत आहेत.
3आगामी दिवसात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Temperature humidity is again at 42 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.