शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, पगार कधी होणार ? दर महिन्याला शिक्षकांची आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 19:56 IST

शिक्षकांच्या पगारात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही प्रशासनाकडून दिला गेला होता. मात्र, त्याचे पुढे काहीच झाले नाही.

ठळक मुद्देजून महिन्याच्या पगाराच्या प्रतीक्षेत जुलै सरत आलाउसनवारीची वेळ शिक्षकांवर आली आहे.

- योगेश पायघन

औरंगाबाद : कॅश मॅनेजमेंट प्रॉडक्ट (सीएमपी) या प्रणाली सुरू केल्यानंतर शिक्षकांचे पगार महिन्याच्या पहिल्या दिवशी होतील, असा दावा जिल्हा परिषदेकडून करण्यात आला होता. मात्र, जुलै सरत आला तरी जून महिन्याचा पगार न मिळाल्याने शिक्षकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पगाराची तारीख चुकल्याने बँक, सोसायटी, विम्याचे हप्ते देण्यात होत असलेल्या विलंबाचा आर्थिक भुर्दंड शिक्षकांना बसत आहे. ( Teachers Waiting for salary every month in Aurangabad ) 

शैक्षणिक सत्र १५ जूनपासून सुरू झाले, तर १५ जुलैपासून प्रत्यक्ष वर्गही सुरू झाले. जिल्ह्यात सुमारे १२ हजार शिक्षक असून, कोरोनाचे संकट, वाढलेला वैद्यकीय खर्च, मुलांचे प्रवेश, शैक्षणिक शुल्क, नव्या शैक्षणिक वर्षाच्या खरेदीचा काळ असतांना विविध बॅंकांचे हप्ते महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात असतात. मात्र, चार आठवडे उलटूनही अद्याप जूनचा पगार झालेला नसल्याने उसनवारीची वेळ शिक्षकांवर आली आहे. शिक्षकांच्या पगारात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही प्रशासनाकडून दिला गेला होता. मात्र, त्याचे पुढे काहीच झाले नाही. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी स्वतंत्र वेतन अधीक्षकांचे कार्यालय असतांना वेतन का होत नाही, असा सवाल शिक्षक, शिक्षक संघटनांतून उपस्थित केला जात आहे.

वेतन अनुदान पडले कमीजिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा तसेच शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता वेतन करण्यासाठी आणखी सुमारे पाच कोटींच्या अनुदानाची आवश्यकता आहे. ही रक्कम कमी पडत असल्याने ट्रेझरीमधून अद्याप वेतन देयके पारित करण्यात आलेली नाहीत. शिक्षण संचालकांनी उर्वरित रक्कम पाठवल्याशिवाय ट्रेझरी पगार करणार नाही, असे सांगण्यात आले आहे.

शिक्षकांची आर्थिक कोंडीअवेळी होणारे पगार शिक्षकांच्या परिवाराची आर्थिक कोंडी करत आहे. दरमहा होणाऱ्या वेतन दिरंगाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य प्रसिद्धीप्रमुख राजेश हिवाळे यांनी केली, तर सीएमपी प्रणाली चांगली मात्र, वेळेवर बजेट मिळवण्यासाठी वेतन अधीक्षक कार्यालयाकडून पाठपुरावा गरजेचा असल्याचे शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांनी म्हटले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदMONEYपैसाTeacherशिक्षक