तहसीलवर धडकला राकाँचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:43 IST2017-08-16T23:43:05+5:302017-08-16T23:43:05+5:30
तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, सातबारा कोरा करावा आदी मागण्यांसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने आ.विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली १६ आॅगस्ट रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

तहसीलवर धडकला राकाँचा मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, सातबारा कोरा करावा आदी मागण्यांसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने आ.विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली १६ आॅगस्ट रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, मोर्चेकºयांनी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. शहरातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. क्रांती चौक मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
कापूस, सोयाबीन, तूर, मूग आदी पिके पावसाअभावी करपून गेली आहेत. सततच्या नापिकीने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सेलू तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतमजुरांच्या हाताला कामे द्यावीत, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, शेतकºयांचे संपूर्ण वीज बिल माफ करावे, पाणीटंचाई आराखड्यास मंजुरी देऊन टँकर सुरू करावेत, मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करावे, विद्यार्थ्यांची कपात केलेली शिष्यवृत्तीची रक्कम परत द्यावी आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना दिले. जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे, सारंगधर महाराज, जि.प. सभापती अशोक काकडे, डॉ.संजय रोडगे, जि.प. सदस्य राजेंद्र लहाने, विनायक पावडे, रामराव उबाळे, अॅड.बालासाहेब रोडगे, पं.स. सभापती पुरुषोत्तम पावडे, उपसभापती गोरख भालेराव, माजी सभापती दत्तराव मोगल, तालुकाध्यक्ष माऊली ताठे, शहराध्यक्ष भारत इंद्रोके, मीनाताई घोगरे, गौस लाला, सचिन शिंदे, पप्पू शिंदे, सुरेंद्र रोडगे, गौतम साळवे, किसान सेलचे शिवाजी गजमल यांच्यासह राष्टÑवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन परवेज सौदागर यांनी केले.