चांगले वागवत नाही म्हणून दात पाडले !
By Admin | Updated: September 26, 2014 01:54 IST2014-09-26T01:15:40+5:302014-09-26T01:54:01+5:30
लातूर : ‘तुम्ही चांगले का वागवत नाही’ असे म्हणत तिघांना काठीने व लाथा-बुक्क्याने तिघांनी मारहाण करून दात पाडल्याची घटना जळकोट तालुक्यातील मरसांगवी येथे घडली.

चांगले वागवत नाही म्हणून दात पाडले !
लातूर : ‘तुम्ही चांगले का वागवत नाही’ असे म्हणत तिघांना काठीने व लाथा-बुक्क्याने तिघांनी मारहाण करून दात पाडल्याची घटना जळकोट तालुक्यातील मरसांगवी येथे घडली. या प्रकरणी जळकोट पोलिस ठाण्यात बुधवारी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुखेड तालुक्यातील तग्याळ येथील विठ्ठल कोडामगले यांच्यासोबत अन्य दोघांनी संगनमत केले. या तिघांनी मरसांगवी येथील भीमराव कोडामगले व त्यांच्या मुला-मुलीसमवेत कुरापत काढून काठीने व लाथा-बुक्क्याने मारहाण केली. यात भीमराव कोडामगले यांच्या तोंडास मार लागल्याने त्यांचे सहा दात पडले आहेत. या प्रकरणी भीमराव कोडामगले यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी भीमराव कोडामगले यांना मारहाण करण्यात आलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल असला तरी अद्याप एकासही अटक करण्यात आलेली नाही.
अधिक तपास पोहेकॉ. जाधव करीत आहेत. (प्रतिनिधी)