‘ती’च्या ढोल-ताशांचा निनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:00 IST2017-09-04T00:00:50+5:302017-09-04T00:00:50+5:30

प्रोझोनच्या हिरवळीवर ‘ती’ने केलेले पवित्र, मांगल्यदायी ढोल-ताशा वादन पाहून उपस्थित लोक समुदाय आश्चर्यचकित झाला आणि ‘ती’च्या कौशल्याला भरभरून दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला.

':Tee"cha Ganpati Programmes | ‘ती’च्या ढोल-ताशांचा निनाद

‘ती’च्या ढोल-ताशांचा निनाद

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गणेशोत्सवाचा उत्साह, आनंद द्विगुणित होतो तो ढोल-ताशांच्या जोशपूर्ण वादनाने. आजवर ढोल-ताशा वादन करावे, तर ते फक्त पुरुषांनीच असे जणू अघोषितपणे ठरलेले होते. मात्र प्रोझोनच्या हिरवळीवर ‘ती’ने केलेले पवित्र, मांगल्यदायी ढोल-ताशा वादन पाहून उपस्थित लोक समुदाय आश्चर्यचकित झाला आणि ‘ती’च्या कौशल्याला भरभरून दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला.
टाटा टी गोल्ड मिक्स्चर प्रस्तुत ‘लोकमत’ ‘ती’चा गणपती उपक्रमांतर्गत रविवारी दुपारी प्रोझोन येथे ढोल- ताशा स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांच्या सन्मानासाठी एकत्रित येऊन शहरातील विविध ढोल पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धेदरम्यान प्रत्येक संघाला ठराविक वेळ देण्यात आला होता. पहिल्या दहा मिनिटांमध्ये पुरुष आणि महिला असे सर्वांना मिळून एकत्रित सादरीकरण करायचे होते. शेवटच्या दहा मिनिटांत मात्र केवळ महिलांना सादरीकरण करायचे होते. या दहा मिनिटांचा योग्य उपयोग करत प्रत्येक संघाच्या महिला सदस्यांनी केलेले ढोल-ताशा वादन अतिशय उत्स्फूर्त ठरले. ढोल-ताशा वादनात आता महिला कुठेही मागे नाहीत, हेच जणू या तरुणींनी दाखवून दिले. महिलांचे ढोल-ताशा वादन पाहण्यासाठी प्रोझोन मॉल येथे आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैलेश कोरडे यांनी संचालन केले. प्रोझोन मॉल हे या उपक्रमाचे व्हेन्यू पार्टनर आहेत.
सुजित नेवपूरकर, जगदीश व्यवहारे, राहुल जोशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

Web Title: ':Tee"cha Ganpati Programmes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.