तांत्रिक मान्यता मंदावली
By Admin | Updated: July 14, 2014 01:02 IST2014-07-14T00:21:25+5:302014-07-14T01:02:42+5:30
गंगाधर तोगरे , कंधार रोजगार व विकासाभिमुख म्हणून नावारुपाला आलेल्या मग्रारोहयोला आता उतरती कळा लागत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे़

तांत्रिक मान्यता मंदावली
गंगाधर तोगरे , कंधार
रोजगार व विकासाभिमुख म्हणून नावारुपाला आलेल्या मग्रारोहयोला आता उतरती कळा लागत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे़ नरेगांतर्गत असलेल्या कामाला तांत्रिक मान्यता देण्याची प्रक्रिया मंदावली असल्याचे चित्र कंधार-लोहा तालुक्यातून समोर आले आहे़
अकुशल मजुरांच्या रिकाम्या हाताला काम आणि कामातून विकास असा व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून 'नरेगा' राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात आली़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी स्थलांतरित होण्याचे प्रमाण घटले़ गावातच रोजगार उपलब्ध होत असल्याने कुटुंबासोबत जाणारी शालेय मुले शाळा नियमित करू लागले़ परंतु योजना अंमलबजावणी होत असताना अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या़ मजुरी वेळेवर न मिळणे, मजुरीचा अल्प दाम आणि ग्रामसेवकांची या योजनेतून वगळण्याची मागणी आदीचा योजना यशस्वीतेसाठी खडतर मार्ग बनला़ लोहा तालुक्यात सिंचन विहिरींना ४ हजार ८८०, सिमेंट बंधाऱ्यांना १०८, माती नाला बांध-७०, नाला सरळीकरण-१४ व सार्वजनिक विहीर-१ अशी तांत्रिक मान्यता देण्यात आली़
कंधार-लोहा तालुक्यात सिंचन विहिरी व सिमेंट बंधारे यांना विक्रमी तांत्रिक मान्यता देण्यात आली़ तसेच माती नालाबांध या कामांनाही चांगली तांत्रिक मान्यता दिल्याचे आकडेवारीवरून दिसते़ तांत्रिक मान्यतेसाठी किती प्रस्ताव आले, त्यातील किती मंजूर झाले, प्रत्यक्ष किती कामांना प्रारंभ झाला, किती कामे पूर्ण व किती अपूर्ण या नंतरच्या बाबी झाल्या़ तांत्रिक मान्यता प्रस्ताव प्रस्तावित केले जातात़
कंधार तालुका २००९-१० ते २०१४-१५ कालावधीत तांत्रिक मान्यतेतील तफावत
वर्षे सिंचन सिमेंट बंधारा मातीनाला नाला सार्वजनिक
विहिरी बांध सरळीकरण विहिरी
२००९-१० २२८ ४९ ५२ ० ०
२०१०-११ ९२६ ६१ १ ० ०
२०११-१२ १७५९ २ ० ० ३
२०१२-१३ ० ० ० ० ०
२०१३-१४ ४६ ४ ० ० ०
२०१४-१५ १४ ० ० ० ०
एकूण २९७३ ११६ ५३ ० ३
लोहा तालुक्यात २००९-२०१० मध्ये मंजूर झालेली कामे
वर्षे सिंचन सिमेंट बंधारा मातीनाला नाला सार्वजनिक
विहिरी बांध सरळीकरण विहिरी
२००९-१० ७४ ७८ ७० १३ १
२०१०-११ १२०७ १० ० ० ०
२०११-१२ ३३०० ५ ० १ ०
२०१२-१३ २९९ १५ ० ० ०