तांत्रिक अधिकाऱ्यास लाच घेताना केले जेरबंद

By Admin | Updated: February 1, 2015 00:58 IST2015-02-01T00:54:19+5:302015-02-01T00:58:54+5:30

तामलवाडी : मंजूर असलेल्या विहिरीचे अनुदान देण्यासाठी एक हजार रूपयांची लाच घेणारे पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी उमेश बळीराम माळीबनकर यांना जेरबंद करण्यात आले़

The technical officer has been roped in for taking a bribe | तांत्रिक अधिकाऱ्यास लाच घेताना केले जेरबंद

तांत्रिक अधिकाऱ्यास लाच घेताना केले जेरबंद


तामलवाडी : मंजूर असलेल्या विहिरीचे अनुदान देण्यासाठी एक हजार रूपयांची लाच घेणारे पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी उमेश बळीराम माळीबनकर यांना जेरबंद करण्यात आले़ ही कारवाई शनिवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने काटी येथे केली़
पोलिसांनी सांगितले की, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर मंजूर व्हावी, यासाठी तक्रारदाराने गत पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायतीकडे रितसर अर्ज केला होता़ मागील सात-आठ दिवसापूर्वी तक्रारदारास मग़्रा़रो़ह़योजनेंतर्गत १ लाख ८९ हजार रूपये विहीर कामासाठी अनुदान मंजूर झाल्याचे पत्र मिळाले होते़ तक्रारदार यांनी काही अनुदान घेत विहीर खोदण्यास सुरूवात केली होती़ त्यानंतर पुढील कामासाठी तक्रारदारांनी पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केली़ मात्र, तेथे त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती़ त्यानंतर त्यांनी पंचायत समितीतील तांत्रिक अधिकारी यांची भेट घेतली़ तेव्हा तांत्रिक अधिकारी उमेश बळीराम माळीबनकर यांनी १००० रूपये दिल्याशिवाय अनुदानाचे पुढील बील काढणार नसल्याचे सांगितले़ त्यानंतर तक्रारदारांनी उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती़ या तक्रारीनंतर एसीबीचे पोलीस अधीक्षक डी़एस़स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक नेकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी भोसले यांच्यासह पोनि आसिफ शेख, सपोफौ भगत, पोना डोरले, तोडकर, पोकॉ नाईकवाडी, मोरे, चालक चिखलीकर आदीच्या पथकाने शनिवारी दुपारी काटी येथे सापळा रचला़ त्यावेळी माळीबनकर यांनी १००० रूपये लाचेची मागणी करून स्वीकारल्यानंतर कारवाई करण्यात आली़ या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ तपास पोनि शेख हे करीत आहेत़ (वार्ताहर)
रोहयोअंतर्गत विहिरीचे अनुदान मंजूर झाल्यानंतर त्यांनी ५१ हजार रूपये उचलले होते़ त्यांनतर विहिरीचे ३० फूट खोदकाम करण्यात आले़ विहिरीच्या पुढील खोदकामासाठी त्यांनी अनुदानाची मागणी केली होती़ मात्र, अनुदान देण्यासाठी १ हजार रूपयांची लाच त्यांच्याकडे मागण्यात आले होते़

Web Title: The technical officer has been roped in for taking a bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.