शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेत तांत्रिक खोडा; पुढच्या आठवड्यात मंत्रालयात बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 19:09 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) की नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय), चूक नेमकी कुणाची? यावर मुंबईतील बैठकीत होणार मंथन

छत्रपती संभाजीनगर : शहर पाणीपुरवठा योजनेचे काम तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करून पूर्ण होत असल्याचे प्रकरण समोर आल्यामुळे योजनेचे काम डेडलाइनमध्ये पूर्ण होण्याची शक्यता संपली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) या दाेन्ही संस्था सध्या एकमेकांवर टोलवाटोलवी करीत असून, पुढच्या आठवड्यात तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करण्यात नेमकी चूक कुणाची, यावर मंत्रालयात तातडीची बैठक होणार आहे. ‘लोकमत’ने चार दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्त्याच्या कामात शहर पाणीपुरवठा योजनेचा गळा कसा घोटला जात आहे, हे उजेडात आणले. याप्रकरणी आता मुंबईत होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे.

समन्वयाने काम मार्गी लावणे गरजेचेशहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना सोमवारी शहरातच बोलावले आहे. त्यांच्यासोबतच्या बैठकीत जलवाहिनीसंदर्भात काय स्थिती आहे, हे जाणून घेणार आहे. दोन्ही विभागांनी समन्वयांनी या  योजनेचे काम मार्गी लावणे गरजेचे आहे. - संजय शिरसाट, मंत्री

बैठकीत सगळे समोर येईल...पुढच्या आठवड्यात मुंबईत या प्रकरणात बैठक घेण्याचे नियोजन सुरू आहे. नेमकी चूक कुणाची हे बैठकीत समोर येईल. शिवाय यावर उपाय काय, याचा विचार करण्यात येईल. ‘लोकमत’मधील सगळे वृत्त मागवून घेतले आहे. मंगळवार किंवा बुधवारी या प्रकरणात बैठक होईल. खातेवाटप झालेले नसले तरी संबंधित सचिवांना बैठकीसाठी बोलावून निर्णय घेण्यात येईल.- अतुल सावे, मंत्री

दोषींवर कारवाईच करू...३० मीटरचा रस्ता आहे, त्यामध्ये २२ मीटर रोड व ८ मीटर जलवाहिनीसाठी जागा होती. त्यात दोन जलवाहिनी असतील. ६ जानेवारीपर्यंत एनएचएआय कोर्टात बाजू मांडणार आहे. तांत्रिक चुका करून जर योजनेला विलंब करण्याचा प्रयत्न एमजेपी व एनएचआयकडून होत असेल तर दोन्ही संस्थांमधील जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई होईलच. पाणीपुरवठा विभागाच्या सचिवांकडे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत सगळे मुद्दे मांडण्यात येतील.- डॉ. भागवत कराड, खासदार

आधीच सात किमीचे काम वगळले...छत्रपती संभाजीनगर ते पैठण या ४५ किमी मार्गाच्या कामाला जानेवारी २०२३ मध्ये सुरुवात झाली. अजूनही त्या मार्गाचे काम पूर्ण झाले नसून ७ किमीचे काम नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाने वगळले आहे. यामुळे कंत्राटदार १८ कोटी रुपयांचे काम न करताच थांबले. जलवाहिनीच्या कामामुळेच ७ किमीचे काम डिस्कोप (कामाला वाव नसणे) या निकषाखाली रद्द करण्यात आले. ४९० कोटी रुपयांवरून फक्त २८९ कोटींमध्ये म्हणजे ४१.०२ टक्के कमी दरात हे काम सेठी आणि मेहरा या कंत्राटदार संस्थांकडे जेव्ही (जॉइंट व्हेंचरशिप) नुसार दिले होते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीAtul Saveअतुल सावेSanjay Shirsatसंजय शिरसाटBhagwat Karadडॉ. भागवत