ट्रकखाली चिरडून एक जागीच ठार

By Admin | Updated: September 5, 2014 00:10 IST2014-09-05T00:02:13+5:302014-09-05T00:10:06+5:30

हिंगोली/कनेरगाव नाका : भरधाव ट्रकखाली चिरडून ४५ वर्षीय मुख्याध्यापक जागीच ठार झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी घडली.

Tear down the truck and kill it on one place | ट्रकखाली चिरडून एक जागीच ठार

ट्रकखाली चिरडून एक जागीच ठार

हिंगोली/कनेरगाव नाका : भरधाव ट्रकखाली चिरडून ४५ वर्षीय मुख्याध्यापक जागीच ठार झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शहराजवळील बळसोंड भागात घडली. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या चालकास ट्रकसह कनेरेगाव नाका येथे पकडण्यात आले.
हिंगोलीहून वाशिमकडे निघालेल्या ट्रक (क्र. आर. जे. १४ जी.डी. ३८७१) च्या चालकाने वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीस धडक दिली. या अपघातात वसंत टोपाजी पवार (वय ४०, रा. औंढा नागनाथ) हे ट्रकखाली चिरडून जागीच ठार झाले. ही घटना हिंगोली- वाशिम मार्गावरील बळसोंडजवळील दालमिलसमोर घडली. याबाबत माहिती मिळताच हिंगोली ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश मोरे, पोनि दिलीप ठोंबळ यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार एन. आर. राठोड, पोना शेख शकील यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अपघातानंतर चालकाने ट्रकसह पोबारा केला. पोलिसांनी याबाबतची माहिती तात्काळ वायरलेसवरून कनेरगाव नाका येथील पोलीस दुरक्षेत्र चौकीस कळवली. कनेरगाव येथील कैलास गावंडे यांनाही सदरील ट्रकचा क्रमांक मिळाल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावरून कनेरगाव नाका येथे चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भुमीराज कुमरेकर, शाम खुळे, सुखदेव पहारे, ग्रामसुरक्षा दलाचे पदाधिकारी लखण जयस्वाल, होमगार्ड भारत राऊत यांनी हिंगोलीकडून आलेल्या प्रत्येक ट्रकची तपासणी केली. आंध्रप्रदेशातील गुंटूरहून दिल्लीकडे निघालेल्या ट्रकने हिंगोलीत एकास धडक देवून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता सदरील वाहन कनेरगाव येथे पकडण्यात आले. ट्रक चालकाचे नाव गोपाल जाट (रा. खंडेल जि. जयपूर राजस्थान) असे असून त्यास वाहनासह कनेरगाव चौकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेले वसंत पवार हे हिंगोली तालुक्यातील बासंबा केंद्रांतर्गत येणाऱ्या येळी येथील जि.प. प्राथमिक शाळेत उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शिक्षकदिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमाची पुर्व तयारी करून ते दुचाकीवरून एका कामगारास हिंगोलीत सोडण्यासाठी गेले होते. काम आटोपून शाळेकडे परत जात असताना बळसोंड भागात रस्त्याच्या कडेला उभे असताना ही दुर्घटना घडली. (प्रतिनिधी)
दुचाकीचालक ठार
हिंगोली : भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक बसून दुचाकीवरील रामदास आबाजी कवाने (रा.येहळेगाव तु.) यांचा मृत्यू झाला. ही घटना कळमनुरी- बाळापूर रस्त्यावरील कामठा फाटा येथे बुधवारी घडली. खंडू कवाने यांनी पोलिसांना ही माहिती दिली.

Web Title: Tear down the truck and kill it on one place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.