पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी संघ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:20 IST2018-01-20T00:20:03+5:302018-01-20T00:20:38+5:30

कर्नाटक येथे २० जानेवारीपासून सुरू होणाºया राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी औरंगाबादचे खेळाडू रवाना झाले आहेत.

 The team departs for the powerlifting competition | पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी संघ रवाना

पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी संघ रवाना

औरंगाबाद : कर्नाटक येथे २० जानेवारीपासून सुरू होणाºया राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी औरंगाबादचे खेळाडू रवाना झाले आहेत. रवाना झालेल्या खेळाडूंत विशाल नवपुते, नितेश नेवलीकर, शुभम बिरारे, अक्षय गाडेकर यांचा समावेश आहे. नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत विशाल नवपुते याने ९० किलो, नितेश नेवलीकर याने ५० किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला होता. शुभम बिरारे याने ६५ किलो वजन गटात द्वितीय, तर अक्षय गाडेकर याने ७० किलो वजन गटात तृतीय क्रमांक मिळवला होता. या खेळाडूंना शेख सलमान व शेख आमेर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Web Title:  The team departs for the powerlifting competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.