शिक्षकांची पदे रिक्त; विद्यार्थ्यांचे नुकसान
By Admin | Updated: July 1, 2014 00:13 IST2014-07-01T00:06:10+5:302014-07-01T00:13:05+5:30
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची दोन तर उर्दुची तीन पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

शिक्षकांची पदे रिक्त; विद्यार्थ्यांचे नुकसान
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची दोन तर उर्दुची तीन पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ही पदे त्वरीत भरावीत अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिली आहे.
या शाळेत मराठी माध्यमाचे २८४ तर उर्दु माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या २७८ असे एकुण ५६२ विद्यार्थी आहेत. मराठी व उर्दु माध्यमाचे वर्ग पहिली ते सातवीपर्यंत आहेत. मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी ७ वर्ग खोल्या बांधण्यात आल्या असून एकुण ९ पैकी ७ शिक्षक कार्यरत आहेत. प्राथमिक शिक्षक व पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त आहे. तीन वर्गखोल्या मोडकळीस आल्या असून त्या ठिकाणीच विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे.उर्दु विभागासाठी सात वर्गखोल्या असून नऊ पैकी सहाच शिक्षक कार्यरत आहेत. या विभागाला पुर्णवेळ मुख्याध्यापक अजूनही मिळालेला नाही. सध्या ताहेर नुर या शिक्षकाकडे मुख्याध्यापकाचा पदभार देण्यात आला आहे. या विभागात मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत आहे. जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेतील एकुण पाच पदे रिक्त असताना ती भरण्याकडे शिक्षण विभागाने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे नुकत्याच सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही रिक्त पदे त्वरीत भरावीत, अन्यथा शाळेला कुलूप ठोकू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. एकीकडे जि.प. शाळेमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने गावातील खाजगी संस्था चालक विद्यार्थ्यांची पळवापळव करण्याचा प्रयत्न करीत आहेत. (वार्ताहर)
पुसेगाव येथे जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची दोन तर उर्दूची तीन पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही रिक्त पदे त्वरीत भरावीत, अन्यथा शाळेला कुलूप ठोकू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.