शिक्षकांकडून परीक्षा केंद्रात मोबाईलचा वापर

By Admin | Updated: March 20, 2016 00:47 IST2016-03-20T00:37:00+5:302016-03-20T00:47:48+5:30

उस्मानाबाद : शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावरील सहा शिक्षकांकडून शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील भरारी

Teachers use mobile phones in the examination center | शिक्षकांकडून परीक्षा केंद्रात मोबाईलचा वापर

शिक्षकांकडून परीक्षा केंद्रात मोबाईलचा वापर


उस्मानाबाद : शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावरील सहा शिक्षकांकडून शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकाने मोबाईल जप्त केले. ही कारवाई शनिवारी सकाळी ११ वाजता करण्यात आली.
जिल्ह्यातील विविध केंद्रांवर सध्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. शनिवारी येथील भोसले हायस्कूलमधील केंद्रावर सकाळी भूगोल-अर्थशास्त्र विषयाच्या परीक्षेला प्रारंभ झाल्यानंतर साधारणपणे साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या नेतृत्वाखालील पथक केंद्रावर धडकले. सदरील केंद्राची तपासणी करीत असतानाच पर्यवेक्षक आणि त्यांचे सहाय्यक म्हणून नेमण्यात आलेल्या सहा गुरूजींकडे मोबाईल असल्याचे दिसून आले. त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत सर्व मोबाईल जप्त केले. तसेच घटनेचाही पंचनामा केला. परीक्षेच्या काळात संबंधित कर्मचाऱ्यांनी सोबत मोबाईल बाळगू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. असे असतानाही संबंधित शिक्षकांनी नियमाची पायमल्ली केली आहे. त्यामुळे सदरील शिक्षकांचा अहवाल आता वरिष्ठ कार्यालयाला सादर केला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Teachers use mobile phones in the examination center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.