शिक्षकांचे वेतन ‘आॅफ लाईन’ !
By Admin | Updated: March 31, 2015 00:39 IST2015-03-30T23:56:43+5:302015-03-31T00:39:07+5:30
बीड : अतिरिक्त शिक्षकांचे वेतन ‘आॅफ लाईन’ ने काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिक्षकांचे वेतन ‘आॅफ लाईन’ !
बीड : अतिरिक्त शिक्षकांचे वेतन ‘आॅफ लाईन’ ने काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्याच्या आयुक्त कार्यालयाने अतिरिक्त शिक्षकांच्या आॅफ लाईन वेतनाला परवानगी दिली आहे. शालार्थ या वेतन प्रणालीमधून शिक्षकांचे वेतन अदा केले जात आहे. मात्र अतिरिक्त शिक्षकांना या प्रणालीतून वेतन मिळणे कठीण आहे. सुरुवातीला डिसेंबर २०१४ पर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे वेतन आॅफ लाईन (प्रचलित पद्धतीने) करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र बीडमध्ये अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाच्या अनुषंगाने मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाची विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा झाली. त्यानंतर शिक्षण सहसंचालक डॉ. सुनील मगर यांनी जून २०१५ पर्यंत आॅफ लाईन अदा करण्यास मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, यापूर्वी १४ आॅक्टोबर २०१४ रोजी शासन परिपत्रकात निर्देशित केल्याप्रमाणे अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावयाची होती, मात्र बीडसह काही जिल्ह्यात अद्याप समायोजन झालेले नाही. त्यामुळे जून २०१५ पर्यंत समायोजन पूर्ण करण्याचे आदेशही मगर यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांची संख्या हजाराहून अधिक आहे.
४आंतरजिल्हा बदल्यांनी आलेले शिक्षक समायोजनात अतिरिक्त ठरलेले शिक्षक व सप्टेंबर २०१४ च्या पटसंख्येनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा समावेश आहे.
४शिक्षण सहसंचालक डॉ.सुनील मगर यांनी काढलेल्या आॅफ लाईन वेतन अदाच्या आदेशात अतिरिक्त शिक्षकांची नेमकी व्याख्या नाही. त्यामुळे अतिरिक्त शिक्षक कोणाला ठरवायचे? हा पेच कायम आहे.