शिक्षक पतीकडून शिक्षिकेचा छळ

By Admin | Updated: June 15, 2014 00:54 IST2014-06-15T00:41:56+5:302014-06-15T00:54:18+5:30

औरंगाबाद : दोघेही पती-पत्नी एका शाळेत शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना संस्कृतीचे धडे देतात;

Teacher's persecution from a teacher husband | शिक्षक पतीकडून शिक्षिकेचा छळ

शिक्षक पतीकडून शिक्षिकेचा छळ

औरंगाबाद : दोघेही पती-पत्नी एका शाळेत शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना संस्कृतीचे धडे देतात; पण स्वत:च्या घरात आचरण करताना मात्र ‘संस्कृती कोणत्या गाढवीचे नाव’, असे म्हणत शिक्षक पतीने आपल्या पत्नीला रात्रभर बेदम मारहाण करीत तिचा गळा दाबून जिवे मारण्याचाही प्रयत्न केला.
तिचा पती किरण देहाडे (२४) हा काल रात्री १२ वाजेपासून सकाळी ९ वाजेपर्यंत तिला मारत होता. सिडको ठाण्याचे निरीक्षक राजकुमार डोंगरे यांना ही माहिती मिळाली तेव्हा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तिला घाटीत दाखल केले. सदरील शिक्षिकेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केला जात होता. काल घर बांधकामासाठी माहेरून ५ लाख रुपये आणले नाहीत म्हणून हडको परिसरातील श्रीकृष्णनगर येथे तिचा अनन्वित छळ केला.
आज पीडित शिक्षिकेच्या संयमाचा बांध सुटला आणि तिने सिडको पोलिसांना आपल्या शिक्षक पती व सासरच्या मंडळींचे कारणामे सांगितले. अंगावर सर्वत्र मारहाणीच्या खुणा पाहून काही वेळ पोलीसही चक्रावून गेले. या प्रकरणी स्वाती किरण देहाडे (२४) हिच्या तक्रारीवरून पती किरण देहाडे, सासू, सासरा, नणंद आदींसह एकूण १० जणांविरुद्ध सिडको ठाण्यात भादंवि ४९८ व ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Teacher's persecution from a teacher husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.