मुख्याध्यापकाकडून शिक्षिकेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:42 IST2017-07-22T00:39:25+5:302017-07-22T00:42:22+5:30
विडा : शाळा भरण्यास उशीर असल्याची संधी साधून मुख्याध्यापकाने शाळेतीलच सहशिक्षिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

मुख्याध्यापकाकडून शिक्षिकेचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
विडा : शाळा भरण्यास उशीर असल्याची संधी साधून मुख्याध्यापकाने शाळेतीलच सहशिक्षिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना केज तालुक्यातील चिंचपूर वस्ती (येवता) येथील जि.प. शाळेत सकाळी घडली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.
पांडुरंग चंद्रकांत जोगदंड असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. शाळेत दीड वर्षांपासून कार्यरत सहशिक्षिकेला जोगदंड याने निशाणा बनवीत अत्याचाराचा प्रयत्न केला. यावेळी जोगदंड याने तुला माझ्या गावात नोकरी करायची आहे, कुणाला सांगितल्यास तुझी बदनामी करीन, अशी धमकी दिली. हा सर्व प्रकार शिक्षिकेने पतीला सांगितल्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल झाला.