शिक्षकांमध्ये ‘फ्रीस्टाईल’
By Admin | Updated: February 28, 2017 00:59 IST2017-02-28T00:58:25+5:302017-02-28T00:59:42+5:30
माजलगाव : शहरातील रंगोली कॉर्नर परिसरात सोमवारी सकाळी ९ वाजता दोन शिक्षकांत ‘फ्रीस्टाईल’ हाणामारी झाली.

शिक्षकांमध्ये ‘फ्रीस्टाईल’
माजलगाव : शहरातील रंगोली कॉर्नर परिसरात सोमवारी सकाळी ९ वाजता दोन शिक्षकांत ‘फ्रीस्टाईल’ हाणामारी झाली.
रंगोली कार्नर परिसरात दररोज सकाळी शिक्षक शाळांवर जाण्यासाठी वाहनांच्या प्रतीक्षेत थांबतात. सोमवारी सकाळी जि.प.चे दशरथ सोळंके व नारायण कचरे हे दोन शिक्षक गप्पा मारत थांबले होते. तेथे तालुका शिक्षक पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक व शिक्षक रमेश फपाळ आले. त्यांना पाहून कचरे यांनी शिक्षक पतसंस्था कर्जवाटपात मर्जीतल्यांनाच प्राधान्य दिले जात असल्याचा टोमणा मारला. ही बाब फपाळ यांनी ऐकली. त्यानंतर दोघांत शाब्दिक चकमक उडाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. भररस्त्यात फपाळ व कचरे या दोन शिक्षकांत हाणामारी झाली. कचरे यांच्या फिर्यादीवरुन रमेश फपाळ व एक अनोळखी यांच्यावर शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. (वार्ताहर)