पालकाने लगावली कानशिलात शिक्षकाच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:05 IST2021-02-05T04:05:06+5:302021-02-05T04:05:06+5:30

वैजापूर : पहिली ते चौथीपर्यंत वर्ग सुरू झालेले नसतानाही माझ्या मुलाला शाळेत का येऊ देत नाहीस म्हणून एका पालकाने ...

The teacher's ear stone was planted by the parents | पालकाने लगावली कानशिलात शिक्षकाच्या

पालकाने लगावली कानशिलात शिक्षकाच्या

वैजापूर : पहिली ते चौथीपर्यंत वर्ग सुरू झालेले नसतानाही माझ्या मुलाला शाळेत का येऊ देत नाहीस म्हणून एका पालकाने शिक्षकाला शिवीगाळ करून कानशिलात लगावली. ही घटना वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथील जिल्हा परिषद शाळेत २९ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी पालकाला अटक करण्यात आली असून, त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे. भगवान सोपान सोनवणे असे आरोपी पालकाचे नाव आहे.

योगेश देवराव गवळी (रा. शिवशंकरनगर, वैजापूर) हे गोयगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ते शाळेत विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे फाॅर्म भरण्याचे काम करीत होते. यावेळी त्याठिकाणी भगवान सोनवणे आले व त्यांनी माझ्या मुलाला शाळेत का येऊ देत नाहीस, असे म्हणून शिक्षक योगेश गवळी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी गवळी यांनी सध्या पहिली ते चौथीपर्यंत वर्ग भरत नसल्याचे त्यांना समजावून सांगितले. मात्र, त्यांनी काहीही न ऐकता शिष्यवृत्तीचे फाॅर्म फाडून फेकत शिक्षक गवळी यांच्या श्रीमुखात भडकावली. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता, त्याची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे.

Web Title: The teacher's ear stone was planted by the parents