जिल्ह्यातील शिक्षकांची उपस्थिती एका क्लिकवर

By Admin | Updated: November 4, 2014 01:39 IST2014-11-04T01:21:11+5:302014-11-04T01:39:43+5:30

औरंगाबाद : शालार्थ प्रणाली, यू डायससारख्या योजना यशस्वीपणे राबविणे सुरू झाले असून शिक्षण विभाग आॅनलाईन करण्याच्या पुढच्या टप्प्यात आता जिल्हाभरातील शिक्षकांची

Teachers attend a district with one click | जिल्ह्यातील शिक्षकांची उपस्थिती एका क्लिकवर

जिल्ह्यातील शिक्षकांची उपस्थिती एका क्लिकवर


औरंगाबाद : शालार्थ प्रणाली, यू डायससारख्या योजना यशस्वीपणे राबविणे सुरू झाले असून शिक्षण विभाग आॅनलाईन करण्याच्या पुढच्या टप्प्यात आता जिल्हाभरातील शिक्षकांची दैैनंदिन उपस्थिती, रजा व गैैरहजेरी आदी माहिती शिक्षणाधिकाऱ्यास एका क्लिकवर उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याअनुषंगाने देवगिरी महाविद्यालयाच्या सभागृहात सोमवारी (दि.३) बोलावण्यात आलेल्या केंद्रप्रमुखांच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या.
प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी सांगितले की, शाळा सकाळी ९.३० वाजता भरल्यानंतर अर्ध्या तासात म्हणजे १० वाजेपर्यंत जिल्हाभरात किती शिक्षक शाळेत हजर आहेत, किती गैरहजर आहेत, रजेवर किती आहेत, याची माहिती सर्वांना आॅनलाईन उपलब्ध करून देणारे सॉफ्टवेअर विकसित केले जात आहे. त्यासाठी काही माहिती आजच्या बैठकीत घेण्यात आली.
दुसऱ्या सत्रास शुक्रवारी प्रारंभ
दिवाळी सुटी संपून शुक्रवारी (दि.७) शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येकी तीन शाळांना भेटी द्याव्यात, शाळेतून स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी गतीने व्हावी, यासाठी पावले उचलावीत आदी सूचना यावेळी करण्यात आल्या.
पोषण आहाराचे दर वाढले
शालेय पोषण आहाराची योजना राबविण्यात गेल्या वर्षी औरंगाबाद जिल्हा पिछाडला होता. त्या पार्श्वभूमीवर या योजनेची पाहणी दि. २६, २७ व २८ नोव्हेंबर रोजी संचालकांमार्फत केली जाणार आहे. त्यामुळे आवश्यक त्या नोंदी पूर्ण करून घ्याव्यात, असे केंद्रप्रमुखांना आदेश देण्यात आले. शालेय पोषण आहाराचे दर माध्यमिक साठी प्रति विद्यार्थी ३ रुपये ५० पैैसे व उच्च माध्यमिक विभागातील प्रति विद्यार्थ्यांसाठी ५ रुपये २० पैसे असा करण्यात आला आहे.
डिसेंबरपासून आॅनलाईन माहिती
४शिक्षक शाळेत वेळेवर येतात की नाही, हे तपासणे या सॉफ्टवेअरमुळे सहज शक्य होणार आहे. साधारण दि.१ डिसेंबरपासून हे सॉफ्टवेअर कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिक्षकांना आॅनलाईन वेतनासाठी शालार्थ योजना यापूर्वीच लागू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक शिक्षकाला एक आयडी देण्यात आला आहे.
४याच आयडीची मदत या सॉफ्टवेअरमध्ये घेतली जात आहे. सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचे नाव व मोबाईल क्रमांक जमा करण्याच्या सूचना सोमवारच्या बैैठकीत देण्यात आल्या. मुख्याध्यापक या सॉफ्टवेअरवर जाऊन शिक्षकांच्या हजेरी, रजा नोंदवतील. ही माहिती त्वरित आॅनलाईन होईल, असे देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Teachers attend a district with one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.