दुचाकीवरून पडल्याने शिक्षकाचा झाला मृृत्यू
By Admin | Updated: August 10, 2014 01:30 IST2014-08-10T00:18:49+5:302014-08-10T01:30:45+5:30
शिरडशहापूर : औंढा तालुक्यातील सारंगवाडी येथील शिक्षक रामू अंबाजी ढोंबरे (२६) यांचा सांगली जिल्ह्यात अपघाती मृत्यू झाला आहे.

दुचाकीवरून पडल्याने शिक्षकाचा झाला मृृत्यू
शिरडशहापूर : औंढा तालुक्यातील सारंगवाडी येथील शिक्षक रामू अंबाजी ढोंबरे (२६) यांचा सांगली जिल्ह्यात अपघाती मृत्यू झाला आहे. खानावळीवरून डब्बा आणण्यासाठी मोटारसायकलवरून जात असताना वाहन घसरून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना ६ आॅगस्ट रोजी घडली.
मयत रामू ठोंबरे हे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथील जि.प. शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते.
५ आॅगस्ट रोजी शाळा सुटल्यानंतर ते घरी आले व सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मेसवरून डब्बा आणण्यासाठी स्वत:च्या मोटारसायकलवरून निघाले होते. मोटारसायकल स्लिप होवून ते खाली पडले. त्यावेळी तेथील नागरिकांनी त्यांना तात्काळ सरकारी दवाखान्यात नेले.
प्राथमिक औषधोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना सांगली येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे औषधोपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे निधन झाले. मयत ढोंबरे यांचा मृतदेह सांगलीहून त्यांच्या मुळगावी सारंगवाडी येथे आणण्यात आला. त्यानंतर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, मुलगी, बहिण असा परिवार आहे.
सारंगवाडी गावातील माजी सैनिक व माजी जि.प. सदस्य अंबादास ठोंबरे यांचा तो मुलगा होता. (वार्ताहर)