छेड काढणाºया शिक्षकास चोपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:20 IST2017-08-13T00:20:21+5:302017-08-13T00:20:21+5:30

विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला बळजबरीने दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न करणाºया शाळेच्या शिक्षकाला सजग विद्यार्थिनींनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे दामिनी पथक आणि चार्लींनी चांगलाच धडा शिकविला

 The teacher was chased away | छेड काढणाºया शिक्षकास चोपले

छेड काढणाºया शिक्षकास चोपले

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला बळजबरीने दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न करणाºया शाळेच्या शिक्षकाला सजग विद्यार्थिनींनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे दामिनी पथक आणि चार्लींनी चांगलाच धडा शिकविला. शनिवारी सकाळी त्या रोमिओ शिक्षकाला उद्धवराव पाटील शाळा परिसरात पोलिसांनी अटक केली.
मोहम्मद अब्दुल माजीद (३७, रा. राहत कॉलनी), असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक वसीम हाश्मी यांनी सांगितले की, हिमायतबाग परिसरातील उद्धवराव पाटील हायस्कूलमध्ये शिकणाºया काही मुली बेगमपुरा परिसरात राहतात. त्या शाळेत पायी ये-जा करतात. ३१ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास दहावीतील काही मुली नेहमीप्रमाणे भीमराजनगरमार्गे शाळेत जात
होत्या.
एक मुलगी सर्वात पुढे होती. तेव्हा आरोपी हा दुचाकीवरून (एमएच-२० बीके-३५१७) पुढे गेला आणि सर्वात पुढे असलेल्या एका मुलीस त्याने दुचाकीवर बसण्यास सांगितले. मुलीने त्यास नकार देताच आरोपीने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. पीडितेने त्याच्या हाताला झटका देत दप्तर तेथेच फेकून ती मैत्रिणींच्या दिशेने पळाली. त्यामुळे आरोपी तेथून पसार झाला.
घाबरलेल्या मुलीने हा प्रकार तिच्या मैत्रिणीला आणि घरी आई-वडील आणि दुसºया दिवशी शाळेतील शिक्षकाला सांगितला. या घटनेची गंभीर दखल घेत शाळेने बेगमपुरा पोलीस आणि दामिनी पथकाला याबाबत कळविले. दामिनी पथकाने लगेच दुसºया दिवशी शाळेत जाऊन मुलींना धीर देत त्यांना त्यांचा मोबाइल नंबर दिला आणि आरोपी दिसल्यास तात्काळ कळवावे, असे आवाहन केले. याशिवाय चार्ली पथकानेही परिसरात गस्त
वाढविली.
शनिवारी सकाळी तो दुचाकीस्वार आरोपी शाळेच्या चौकात उभा असल्याचे विद्यार्थिनींनी पाहिले आणि त्यांनी ही बाब फोन करून पोलिसांना कळविली. गस्तीवरील दामिनी पथकातील पो.हे.कॉ. स्वाती बनसोड आणि कर्मचाºयांनी मुलींच्या मदतीने आरोपी अब्दुल माजीदला पकडले.

Web Title:  The teacher was chased away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.