शिक्षकांच्या बदल्या लांबणीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2016 23:49 IST2016-05-08T23:09:07+5:302016-05-08T23:49:35+5:30

बीड : जिल्हा परिषदेतील गट ‘क’ व ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया १० मे पासून सुरु होत आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांची माहिती मागविली असून, समुपदेशनाने बदल्या होणार आहेत.

Teacher transfers for a long time! | शिक्षकांच्या बदल्या लांबणीवर !

शिक्षकांच्या बदल्या लांबणीवर !


बीड : जिल्हा परिषदेतील गट ‘क’ व ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया १० मे पासून सुरु होत आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांची माहिती मागविली असून, समुपदेशनाने बदल्या होणार आहेत.
ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार होऊ घातलेल्या या बदल्यांचे चित्रीकरण केले जाणार आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी व रिक्त जागा याची माहिती आॅनलाईन दिली जाणार आहे. त्यामुळे बदल्यांमध्ये कोणावरही अन्याय होणार नाही, असे सीईओ नामदेव ननावरे यांनी सांगितले.
१० मे रोजी सकाळी ११ वाजता स्काऊट गाईड भवनात आरोग्य, शिक्षण, व बालकल्याण विभागाच्या बदल्या निश्चित केल्या आहेत. १२ रोजी बांधकाम, वित्त, लघुपाटबंधारे विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तर १३ रोजी सामान्य प्रशासन विभाग, पंचायत विभाग, कृषि व पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडेल.
प्रशासकीय १० तर विनंती ५ टक्के बदल्या होतील. १० वर्षे एका तालुक्यात कार्यरत असलेले कर्मचारी प्रशासकीय तर ५ वर्षे एका तालुक्यात कर्तव्य बजावणारे कर्मचारी विनंती बदलीला पात्र ठरणार आहेत. मुख्यालयात एकाच विभागात पाच वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही इतर विभागात बदल्या होतील.
मंगळवारपासून सुरू होणाऱ्या बदल्यांकडे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
१० मे रोजी होऊ घातलेल्या शिक्षकांच्या बदल्या लांबणीवर पडणार आहेत.
४२०१५-२०१६ च्या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता नुकतीच मंजूर झाली आहे. त्यात काही त्रुटी आढळल्या आहेत.
४दुरुस्तीसाठी उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. संचमान्यता अंतिम झाल्यानंतर तालुकास्तरावर समायोजन घ्यावे लागेल, त्यानंतर जिल्हास्तरावरील प्रक्रिया घेतली जाईल.
४शिक्षकांच्या बदल्यांना वेळ लागणार आहे. मुदत वाढवून द्यावी, अशा विनंतीचा प्रस्ताव शिक्षण विभागाने सीईओंकडे पाठविला

Web Title: Teacher transfers for a long time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.