शिक्षिकेने केली उद्याची स्वाक्षरी आजच!
By Admin | Updated: November 13, 2014 00:52 IST2014-11-13T00:42:50+5:302014-11-13T00:52:14+5:30
संदीप अंकलकोटे , चाकूर गणित शिकविणाऱ्या शिक्षकाचे आपल्या जीवनात गणित चुकते असे ऐकावयास मिळते़ तशीच घटना तालुक्यातील घरणी येथील जिल्हा परिषद शाळेतील एका गणित विषयाच्या शिक्षिकेची घडली आहे़

शिक्षिकेने केली उद्याची स्वाक्षरी आजच!
संदीप अंकलकोटे , चाकूर
गणित शिकविणाऱ्या शिक्षकाचे आपल्या जीवनात गणित चुकते असे ऐकावयास मिळते़ तशीच घटना तालुक्यातील घरणी येथील जिल्हा परिषद शाळेतील एका गणित विषयाच्या शिक्षिकेची घडली आहे़ या शिक्षिकेने बुधवारबरोबरच गुरुवारच्या हजेरीची स्वाक्षरी केल्याचे उघडकीस आले आहे़ त्यामुळे ही शिक्षिका चांगलीच अडचणीत आली आहे़ या घटनेबाबत गावात जोरदार चर्चा होती़
तालुक्यातील घरणी येथील जिल्हा परिषद शाळेस पंचायत समिती सभापती करिमसाब गुळवे यांनी बुधवारी दुपारी भेट दिली़ या शाळेत ४२७ विद्यार्थी असून १३ कर्मचारी आहेत़ यापैकी बुधवारी शाळेचे मुख्याध्यापक, एक शिक्षक आणि एक शिपाई हे अर्जित रजेवर असल्याचे आढळले़ त्याचबरोबर ज्यांच्याकडे प्रभारी पदाचा भार आहे तेही मिटींगला गेल्याचे निष्पन्न झाले़
गुळवे यांनी हजेरी पुस्तकाची पाहणी केली असता इयत्ता पाचवीच्या वर्गास शिकविणाऱ्या शिक्षिका एस़एस़ माने यांनी १२ नोव्हेंबरच्या रकान्यात सकाळ व दुपारची स्वाक्षरी केली असल्याचे आढळले़ तसेच गुरुवार १३ नोव्हेंबरच्या हजेरीपटावर उपस्थिती दर्शविणारी स्वाक्षरी केल्याचे आढळून आले़ त्यामुळे गुळवे यांनी सदरील शिक्षिकेकडे चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही़ या घटनेची बुधवारी दिवसभर शाळेत व गावभरात जोरदार चर्चा सुरु होती़ या घटनेमुळे सहशिक्षिका अडचणीत आल्या आहेत़