शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

"मम्मी मुझे ट्यूशन नहीं जाना"; १० वर्षीय चिमुकलीवर शिक्षकाकडून अत्याचार, दीड वर्षापूर्वी गमावली होती नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:22 IST

छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगी क्लासेसच्या शिक्षकाने १० वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचे समोर आलं आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime:छत्रपती संभाजीनगर येथून अत्याचाराची हादरवणारी घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेणपुंजीतील शिवनेरी कॉलनीत टॉपर क्लासेस या खासगी क्लासेसमध्ये १० वर्षीय विद्यार्थिनीवर ४५ वर्षीय शिक्षकाने वारंवार अत्याचार केला.  ही धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. त्यानंतर संतप्त नातेवाइकांनी वासनांध शिक्षक सुभाष जाधव याला चोप दिला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार घेत आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

आईच्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी खासगी शाळेत इयत्ता चौथीत शिकते. दीड वर्षापासून पीडित मुलगी तिच्या दोन भावांसह सुभाष जाधवकडे रोज दुपारी ४ ते ६ पर्यंत ट्यूशनसाठी जाते. सुभाष जाधव ट्यूशनच्या बाथरूममध्ये घाणेरडे व्हिडीओ दाखवून मुलीवर वारंवार अत्याचार करत होता. आरोपी सुभाष जाधवने मुलीला धमकावले देखील होते. कोणाला सांगितल्यास तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी त्याने दिली होती.  मात्र मुलीने हा सगळा प्रकार तिच्या आईला सांगितला आणि या अत्याचाराला तोंड फुटले. 

शनिवारी ट्यूशनहून परतल्यावर मुलीने तिच्या आईला'मम्मी, मुझे कल से ट्यूशन नहीं जाना' असं सांगितले आणि ती रडू लागली. आईने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता मुलीने सगळा प्रकार सांगितला. पीडितेच्या आईने दोन्ही मुलांना याबाबत विचारले तेव्हा त्यांनीही जाधव सर रोज तिला बाथरूममध्ये घेऊन जातात असं सांगितले. त्यानंतर महिलेले तिच्या कुटुंबियांना हा प्रकार सांगितला. संतप्त नातेवाईकांना सुभाष जाधवला पकडून बेदम चोप दिला ज्यामध्ये तो जखमी झाला.

दरम्यान, सुभाषला यापूर्वीही गैरकृत्यांमुळे एका शाळेतून काढून टाकले होते. तो दीड वर्षापूर्वी रांजणगाव शेणपुंजीतील एका खासगी शाळेत शिकवत होता. शाळेतून काढल्यानंतर त्याने टॉपर क्लासेस नावाने खासगी क्लासेस सुरू केले. 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस