‘सेल्फी’ला शिक्षकांचा विरोध
By Admin | Updated: November 6, 2016 00:33 IST2016-11-06T00:33:59+5:302016-11-06T00:33:59+5:30
औरंगाबाद : प्रत्येक सोमवारी विद्यार्थ्यांसोबत ‘सेल्फी’ काढून शिक्षकांनी तो ‘सरल’मध्ये अपडेट करण्याचा आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.

‘सेल्फी’ला शिक्षकांचा विरोध
जि.प. सीईओंना निवेदन : प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीची मागणी
वर्धा : ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यांकरिता राज्यस्तरावर असहकार व कामबंद आंदोलन पुकारण्यात येत आहे. या आंदोलनात वर्धेतील कंत्राटी ग्रामसेवक वगळता इतर ग्रामसेवक सहभागी होणार असल्याचे पत्र जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांना शनिवारी दिले.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वर्धा शाखेने दिलेल्या या पत्रानुसार, जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक सोमवारपासून असहकार आंदोलन करणार आहेत. या दिवशी ग्रामसेवक पंचायत समिती स्तरावर एकदिवसीय धरणे देणार आहेत. यानंतर १७ नोव्हेंबरपासून राज्यभर सुरू होणाऱ्या कामबंद आंदोलनात सहभागी होतील. या दिवशी संपूर्ण ग्रामसेवक त्यांच्या कार्यालयाच्या किल्ल्या प्रशासनाच्या हवाली करणार आहेत. याच दरम्यान १५ नोव्हेंबर रोजी नागपूर येथील आयुक्त कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात वर्धेचे ग्रामसवेक सहभागी होणार असल्याचे पत्र मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना दिले आहे. सदर आंदोलनातून प्रश्न सुटेपर्यंत किंवा राज्य संघटनेच्या निर्णयापर्यंत माघार घेतली जाणार नसल्याचे कळविले आहे. निवेदन देताना संघटनेचे कुंदन वाघमारे यांच्यासह राजू नागपूरकर, विलास नव्हळे, मनोज माहुरे, शिर्शिकर, सपकाळे, जयंत ठाकरे यांच्यासह ग्रामसेवक उपस्थित होते.(प्रतिनिधी)