वेतन विलंबनाचा शिक्षकांना फटका..
By Admin | Updated: August 8, 2016 00:38 IST2016-08-08T00:31:17+5:302016-08-08T00:38:56+5:30
जालना : शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला करण्याचा आदेश आहे. परंतु शालार्थ प्रणाली लावून तीन वर्षे उलटले तरी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन वेळत होत नाही.

वेतन विलंबनाचा शिक्षकांना फटका..
जालना : शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला करण्याचा आदेश आहे. परंतु शालार्थ प्रणाली लावून तीन वर्षे उलटले तरी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन वेळत होत नाही. या विलंबनाचा शिक्षकांना फटका बसत असून, विविध कारणांसाठी घेतलेल्या कर्जांचे हप्ते फेडताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुरू केलेली शालार्थ प्रणाली कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागाचे साडेसहा हजार शिक्षक कार्यरत आहेत. त्यात माध्यमिक ३२ व हायस्कूलच्या २०० शिक्षकांचा सुध्दा समावेश आहे. यामध्ये तब्बल ४ हजार ५०० शिक्षक सभासद कर्जदार आहेत. या सर्व शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला होणे अपक्षित आहे.परंतु तसे होत नाही.
महिन्याचा १ ते ५ तारखेपर्यंत आॅनलाईन बिले सादर केल्यास तरच वेतन वेळेवर होण्याची शक्यता असते. परंतु मुख्याध्यापकापासून ते गटशिक्षणाधिकारी कार्यालय आणि गटविकास अधिकाऱ्यांसह जी यंत्रणा यामध्ये काम करते ती सुरळीतपणे काम करत नसल्याचा आरोप शिक्षकांतून केला जात आहे. जर या यंत्रणेला नेमून दिलेले कामे ती नमूद तारखेत करण्याची कुठलेच बंधन नसल्याने त्यांच्या सोयीनुसार वेतनाची बिले सादर करण्यात येतात. त्यामुळे वेतनास विलंब होत असून, यावर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त होत आहे.
परिणामी शिक्षकांना मिळणारे वेतन वेळेत मिळत नसल्याने बँका, सोसायटी, आणि एलआयसी यांच्याकडून दर महिन्याला आकारण्यात येत असलेल्या कर्जावर दरसाल दरशेकडा १३ ते १४ टक्के व्याजाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. (प्रतिनिधी)