शिक्षक, मुख्याध्यापकाची १५३ पदे रिक्त

By Admin | Updated: July 8, 2014 00:34 IST2014-07-08T00:00:31+5:302014-07-08T00:34:21+5:30

हदगाव : तालुक्यातील १९६ जि़प़ शाळांपैकी ३ माध्यमिक १९३ प्राथमिक शाळांत मान्य पदे ९५८ असताना ८१४ पदावर शिक्षक कार्यरत असून तब्बल १५३ पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत़

Teacher, Headmaster's vacant posts 153 | शिक्षक, मुख्याध्यापकाची १५३ पदे रिक्त

शिक्षक, मुख्याध्यापकाची १५३ पदे रिक्त

हदगाव : तालुक्यातील १९६ जि़प़ शाळांपैकी ३ माध्यमिक १९३ प्राथमिक शाळांत मान्य पदे ९५८ असताना ८१४ पदावर शिक्षक कार्यरत असून तब्बल १५३ शिक्षक, मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर शिक्षकांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत़
कार्यरत पदांमध्ये मुख्याध्यापक ४४, प्राथमिक पदवीधर ५३ व सहशिक्षक ७१७ आहे़ यावरून रिक्त पदे - मुख्याध्यापक ३७, पदवीधर २८ व सहशिक्षक ८८ एकूण १५३ शिक्षकांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत़ यामध्ये अतिरिक्त ठरलेल्या सहशिक्षकांची संख्या ९ आहे़ या रिक्त पदांमुळे अनेक ठिकाणी १ ते ७ वर्ग सांभाळण्यासाठी २ शिक्षक कार्यरत आहेत़ मुख्याध्यापक बैठका, अहवाल देणे यामध्ये व्यस्त असतात़ सात वर्गाचा भार एकाच शिक्षकावर पडतो़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून ग्रामस्थ (पालक) व शिक्षकांत तणाव निर्माण होवून अनेक ठिकाणी कायदा हातात घेवून पालक शाळेला कुलूप ठोकतात़ यामुळे शिक्षण विभागावर नामुष्कीची वेळ येते़ शाळेला इमारती असूनही विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसून शिक्षणाचे धडे घ्यावे लागतात़ ठिकठिकाणी विद्यार्थीसंख्या कमी असूनही शिक्षकांची संख्या जास्त आहे़ याकडे शिक्षण विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे़
यामध्ये कें़ प्रा़ शाळा (कन्या हदगाव) मान्य पदे-६९ असताना कार्यरत पदे ६३ असून रिक्त पदे ६ आहेत़ के़ प्रा़ शाळा ल्याहरी मान्य पदे ५९, कार्यरत-५४, रिक्त-६, कें़प्रा़शाळा भानेगाव मान्य पदे-६४, कार्यरत-४९, रिक्त-१५, के़प्रा़शा़ निवघा मान्य पदे-९५, कार्यरत-७४, रिक्त-२१, कें़ प्रा़ शाळा कोळी मान्य पदे-७२, कार्यरत-५४, रिक्त १८, कें़ प्रा़ शाळा तळणी-मान्य पदे ५७, कार्यरत-४०, रिक्त-१८, कें़ प्रा़ शा़ पळसा- मान्य पदे-५५, कार्यरत पदे-५३, रिक्त-१३, कें़प्रा़शा़ चिंचगव्हाण मान्यपदे-५३, कार्यरत-४८, रिक्त-५, कें़प्रा़ शा़ मनाठा मान्यपदे-६२, कार्यरत५४, रिक्त-९, कें़प्रा़ शाळा (कन्या) तामसा मान्य पदे-८६, कार्यरत पदे-७६, रिक्त-११, कें़ प्रा़ शा-लोहा मान्यपदे-३८, कार्यरतपदे-३७, रिक्त-१, कें़प्रा़शा़ पाथरड मान्य पदे-४९, कार्यरतपदे-४३, रिक्त-८, कें़प्रा़शा़ जांभळा- मान्यपदे-२२, कार्यरतपदे २२, कें़प्रा़शाळा आष्टी (क़) मान्यपदे-२०, कार्यरत पदे १६, रिक्त ४, कें़प्रा़शाळा वाळकी (खु़)- मान्य पदे ३४, कार्यरत पदे २६, रिक्त ९, कें़प्रा़शा़ येवली- मान्य पदे ३८, कार्यरत पदे ३२, रिक्त ६, कें़प्रा़शा़ निमगाव मान्य पदे ६५, कार्यरत पदे ६३, रिक्त , जि़प़हायस्कूल हदगाव-मान्य पदे-२, कार्यरत पदे-२, जि़प़हा़ हदगाव (उर्दू) मान्य पदे-४, कार्यरत पदे-४, जि़प़हा़ तामसा (उर्दू) मान्य पदे-४, कार्यरत पदे-४, जि़प़हा़ तामसा- मान्य पदे-७, कार्यरत पदे-७, जि़प़हा़ आष्टी मान्य पदे ३, कार्यरत पदे-३़ या आकडेवारीवर नजर टाकल्यास तालुक्यातील माध्यमिक शाळांत शिक्षकांची मान्य पदांची संख्या कमी आहे़ वर्गाची संख्या ७ व शिक्षकांची ४,२,३ अशी आहे़ या उतरत्या आलेखामुळे ढिसाळ नियोजनामुळे, राजकीय दबावाखाली जि़प़ शाळांचे तीनतेरा वाजले आहेत़ विद्यार्थीसंख्या व शिक्षकांची संख्या तफावत असल्यामुळे या शाळांत शिकणाऱ्या गोरगरीब जनतेच्या पाल्यांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेतल्या जात आहे़ (वार्ताहर)
शाळा सुरू होवून जवळपास २० दिवस उलटले तरी शाळेवरील शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ मिटत नाही़ अतिरिक्त ठरलेले शिक्षक इतर शाळेवर जायला तयार नाहीत़ तर अनेक शिक्षक आवडीची गावे न मिळाल्यामुळे दिलेल्या शाळेवर काम करण्यासाठी तयार नाहीत़ तालुक्यात २२ केंद्रांतर्गत १९६ शाळा असून त्यामध्ये ३५ हजार विद्यार्थी ज्ञानार्जनाचे धडे घेतात़ एवढ्या विद्यार्थ्यांसाठी ९५८ शिक्षकांची मान्य पदे आहेत़ यामध्ये मुख्याध्यापक ८१, प्राथमिक पदवीधर ८१, सहशिक्षक ७९६ अशी संख्या आहे़

Web Title: Teacher, Headmaster's vacant posts 153

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.