कर बुडवायचाय? मग थेट औरंगाबाद आरटीओत जा..!
By Admin | Updated: June 29, 2016 01:08 IST2016-06-29T00:34:55+5:302016-06-29T01:08:29+5:30
औरंगाबाद : ट्रान्सपोर्ट संवर्गातील वाहन नॉन ट्रान्सपोर्ट संवर्गात रूपांतरित करताना ६०० पेक्षा अधिक वाहनांनी नियमानुसार कर न भरता शासनाचा

कर बुडवायचाय? मग थेट औरंगाबाद आरटीओत जा..!
औरंगाबाद : ट्रान्सपोर्ट संवर्गातील वाहन नॉन ट्रान्सपोर्ट संवर्गात रूपांतरित करताना ६०० पेक्षा अधिक वाहनांनी नियमानुसार कर न भरता शासनाचा कोट्यवधींचा महसूल बडविल्याचा प्रकार औरंगाबाद आरटीओ कार्यालयात उघडकीस आला आहे. यातील १६० वाहने औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत, तर उर्वरित वाहने मुंबई, पुणे, ठाणे यांसह राज्यभरातील आहेत. या वाहनांचे ट्रान्सपोर्ट संवर्गातून नॉन ट्रान्सपोर्ट संवर्गात रूपांतर करण्यासाठी स्थानिक आरटीओ कार्यालयातून ‘एनओसी’ काढून औरंगाबाद आरटीओ कार्यालयात येण्यास प्राधान्य दिल्याचे उघड झाले आहे.
ट्रान्सपोर्ट संवर्गातील वाहन नॉन ट्रान्सपोर्ट संवर्गात रूपांतरित करताना नियमानुसार कर न भरता शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविल्याचा प्रकार ‘लोकमत’ने समोर आणताच आरटीओ कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
२०११-१३ या कालावधीत ट्रान्सपोर्ट संवर्गातील वाहन नॉन ट्रान्सपोर्ट संवर्गात रूपांतरित करताना ही करबुडवेगिरी करण्यात आली आहे. या प्रकाराविषयी गेल्या काही वर्षांपासून नुसती अंतर्गत चौकशी सुरू होती.
यामध्ये कोणावरही कारवाई झालेली नाही. त्यामुळे याविषयी काहींनी थेट परिवहन आयुक्तालयात तक्रार केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून परिवहन आयुक्तांनी मुंबईहून या प्रकरणाच्या तपासासाठी पथक पाठविले. या पथकाने दोन दिवस आरटीओ कार्यालयाची चांगलीच झाडाझडती घेतली.