तरूणास फासाच्या गंजीवर जाळले
By Admin | Updated: July 3, 2014 00:21 IST2014-07-02T23:29:45+5:302014-07-03T00:21:31+5:30
रोहिलागड : अंबड तालुक्यातील किनगाव शिवारात गट नं. २७२ मध्ये मंगळवारी मध्यरात्री अज्ञात तरूणास फासाच्या गंजीवर जाळण्यात आले.

तरूणास फासाच्या गंजीवर जाळले
रोहिलागड : अंबड तालुक्यातील किनगाव शिवारात गट नं. २७२ मध्ये मंगळवारी मध्यरात्री अज्ञात तरूणास फासाच्या गंजीवर जाळण्यात आले. अंबड - रोहिलागड मार्गावर किनगाव शिवारात ही घटना घडली.
सदर इसमाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षाचे आहे. सदर इसमाला गाडीत आणून रोड लगतच असलेल्या पळाट्याच्या फासाच्या गंजीवर टाकण्यात आले असावे व नंतर त्या फासाच्या गंजीला आग लावण्यात आली असावी असा अंदाज आहे.
आगीचा लोळ उंच असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आगीच्या दिशेने धाव घेतली. मात्र तिथे त्या गंजीवर सदर इसमाचे प्रेत जळताना दिसले.
त्यामुळे त्यांनी किनगाव इथे जावून पोलीस पाटलांनी दूरध्वनीद्वारे अंबड पोलीस ठाण्यात कळविले. नंतर अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक शेख आलमगिर, स.पो.उप.नि. आबासाहेब देशमुख, पोहेकॉ वनारसे, मुकुंद चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन या घटनेचा पंचनामा केला.
प्रेत उत्तरणीय तपासणीसाठी अंबड येथील शासकीय रूग्णालयात हलविले आहे. अधिक तपास पोलिस उपविभागीय अधिकारी विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (वार्ताहर)