टार्गेट रुग्णालये, स्मशानभूमी

By Admin | Updated: January 20, 2015 01:28 IST2015-01-20T01:18:19+5:302015-01-20T01:28:21+5:30

औरंगाबाद : शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रकार वाढत आहेत. चोरट्यांनी आपले सॉफ्ट टार्गेट रुग्णालये आणि स्मशानभूमीला बनविले आहे.

Target Hospitals, Cemetery | टार्गेट रुग्णालये, स्मशानभूमी

टार्गेट रुग्णालये, स्मशानभूमी


औरंगाबाद : शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रकार वाढत आहेत. चोरट्यांनी आपले सॉफ्ट टार्गेट रुग्णालये आणि स्मशानभूमीला बनविले आहे.
वाहने चोरणारे जेरबंद
स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांच्या ध्यानीमनीही नसते की, आपले वाहन चोरीला जाईल. कारण सर्व जण मरण पावलेल्या व्यक्तीच्या दु:खात असतात. याच मानसिकतेचा फायदा उचलत स्मशानभूमीसमोरून वाहने चोरणारी टोळी जिन्सी पोलिसांनी आज गजाआड केली.
पोलिसांनी पकडलेल्या आरोपींनी देशी दारूच्या अड्ड्यांसमोर उभ्या असलेल्या दुचाकीही लांबविल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल नऊ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. शेख मजीद शेख महंमद (रा. फातेमानगर, हर्सूल) आणि सय्यद कैसर सय्यद अहमद (रा. हर्सूल सावंगी), अशी आरोपींची नावे आहेत.
रोशनगेट परिसरात दोन तरुण दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती जिन्सी पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार सापळा रचला. शेख मजीद, सय्यद कैसर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी टीव्ही सेंटर भागातून हे वाहन चोरले होते.
पोलिसांनी दोघांना न्यायालयासमोर हजर केले. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता दोघांनी सिटीचौक व सिडको भागातून चोरी केलेली आणखी आठ वाहने दिली. शेख मजीद वाहन चोरून आणायचा, तर सय्यद कैसर विक्री करायचा. मौजमजेसाठी दोघेही हे काम करीत असत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया, सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, उपनिरीक्षक अमित बागूल, जमादार दिनेश बन, मीर आरेफ अली, सुभाष शेवाळे, इरफान खान, अश्रफ सय्यद, संदीप तायडे आणि संजय नंद यांनी केली.

Web Title: Target Hospitals, Cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.