तन्मय शेंडे हवाई सफरचा मानकरी
By Admin | Updated: July 5, 2014 00:34 IST2014-07-04T23:36:46+5:302014-07-05T00:34:54+5:30
परभणी: लोकमतने शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या संस्काराचे मोती या स्पर्धात्मक उपक्रमातून येथील बालविद्यामंदिर वैभवनगर शाखेचा विद्यार्थी तन्मय प्रभात शेंडे हा हवाई सफरचा मानकरी ठरला आहे.
तन्मय शेंडे हवाई सफरचा मानकरी
परभणी: लोकमतने शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या संस्काराचे मोती या स्पर्धात्मक उपक्रमातून येथील बालविद्यामंदिर वैभवनगर शाखेचा विद्यार्थी तन्मय प्रभात शेंडे हा हवाई सफरचा मानकरी ठरला आहे.
बालवयात मुलांना विमानाबद्दल प्रचंड कुतूहल आणि उत्सुकता असते. आकाशातून जाणाऱ्या विमानाकडे आपसूक नजर गेल्यानंतरही ते विमान कसे असेल, कुठे उतरते त्यात कसे बसतात, वैमानिक विमान कसा चालवितो, ते आकाशात कसे उडते, असे एक ना अनेक प्रश्न बालकांच्या मनात येतात आणि हे प्रश्न पालकांना विचारुन मुले भंडावून सोडतात. विद्यार्थ्यांच्या याच कुतूहुलातून त्यांना हवाई सफर घडविण्याचा उपक्रम लोकमतने आखला. संस्काराचे मोती या सदरातून आयोजित केलेल्या स्पर्धेत बालविद्यामंदिरचा सातवी वर्गाचा विद्यार्थी तन्मय प्रभात शेंडे हा भाग्यवान ठरला.
तन्मयने संस्काराचे मोती निसर्ग सफारी या स्पर्धेत भाग घेतला होता. येत्या १० जुलै रोजी तो मुंबई - दिल्ली आणि दिल्ली - मुंबई असा विमान प्रवास करणार आहे. तन्मयच्या या यशाबद्दल शुक्रवारी संस्थेच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
‘लोकमत’मुळे जिज्ञासूवृत्तीत वाढ
लोकमत संस्काराचे मोती या सदरामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. तसेच त्यांची जिज्ञासूवृत्ती वाढत आहे. लोकमतच्या बक्षिसाचा मानकरी ठरणारा आमच्या शाळेचा तन्मय हा दुसरा विद्यार्थी आहे, अशी प्रतिक्रिया बालविद्यामंदिर वैभवनगर शाखेचे उपमुख्याध्यापक ए. यू. कुलकर्णी यांनी दिली.
संधी मिळाल्याचे भाग्य
लोकमतमुळे मला विमानात बसण्याची संधी प्राप्त झाली, हे माझे भाग्यच आहे. आजपर्यंतच्या सर्वच स्पर्धेत मी सहभागी झालो आणि पुढील स्पर्धेतही सहभागी होईल, अशी प्रतिक्रिया तन्मय शेंडे याने दिली.
संस्कार घडविण्याचे काम
लोकमत संस्काराचे मोतीच्या माध्यमातून मुलांवर संस्कार घडविण्याचे काम होत आहे. लोकमतने नेहमीच विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. या उपक्रमातूनच माझ्या मुलाला विमानात बसण्याची संधी मिळाली, याबद्दल मी लोकमतचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया प्रभात शेंडे यांनी दिली.