टाक्या, कॅन, बॅरल, घागरींची विक्री जोरात

By Admin | Updated: January 30, 2016 00:26 IST2016-01-30T00:08:57+5:302016-01-30T00:26:51+5:30

सितम सोनवणे , लातूर पिण्याचे पाणी साठवून ठेवण्यासाठी नागरिकांना उपाययोजना कराव्या लागत आहेत. त्यामुळे टाक्या, बॅरल, कॅन, घागरी, बकेटस्ला मागणी वाढली आहे.

Tanks, cans, barrels, and junkies sold loud | टाक्या, कॅन, बॅरल, घागरींची विक्री जोरात

टाक्या, कॅन, बॅरल, घागरींची विक्री जोरात


सितम सोनवणे , लातूर
पिण्याचे पाणी साठवून ठेवण्यासाठी नागरिकांना उपाययोजना कराव्या लागत आहेत. त्यामुळे टाक्या, बॅरल, कॅन, घागरी, बकेटस्ला मागणी वाढली आहे. परिणामी, भावही वधारले आहेत. २०० लिटर्स क्षमतेच्या टाक्यांपासून १२०० लिटर्स क्षमतेच्या टाक्यांना मागणी वाढली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार व्यावसायिक टाक्या तयार करून देत आहेत. शिवाय, प्लास्टिकच्या तयार असलेल्या टाक्यांनाही मागणी आहे.
दोनशे, तीनशे लिटर्सच्या प्लास्टीकच्या टाक्या, दोनशे लिटर्सचे कॅन व बॅरल व प्लास्टीक घागरी तसेच दीड हजार, तीन हजार, सात हजार आणि बारा हजार लिटर्सच्या लोखंडी टाक्या बनविण्यासाठी व्यावसायिक व्यस्त आहेत.
३५ लिटरपासून १ हजार लिटर्सपर्यंत प्लास्टीकच्या टाक्या बाजारात उपलब्ध आहे. १५० रुपयांपासून ४५०० रुपये किंमत या टाक्यांची आहे. ३५ लिटरच्या टाक्या दिवसाकाठी लातूरच्या बाजारातून किमान शे-दीडशे टाक्या विक्रीला जात आहेत. तर पुढील लिटर्स क्षमतेच्या टाक्या शंभरच्या आसपास दररोज जातात. यातही लाखांच्या घरात उलाढाल झाली आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांच्या खिशाला यामुळे चाटच बसत आहे.
१७ लिटर्स प्लास्टीकची घागर ८० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत आहे. ८० रुपयांची घागर एका दुकानातून दिवसाला किमान १२ विकल्या जातात. लातूर शहरात अशा घागरींची शंभर दुकाने आहेत. १२०० घागरींची विक्री होते. म्हणजे ९६ हजार रुपये घागरी खरेदीपोटी लातूरच्या नागरिकांना मोजावे लागत आहेत.
दीड हजार लिटर्स, ३ हजार लिटर्स आणि १२ हजार लिटर्स





क्षमतेच्या लोखंडी टाक्यांनाही मागणी वाढली आहे. या टाक्या मात्र ग्राहकांच्या मागणीनुसार बनवून दिल्या जात आहेत. दीड हजार लिटर्सची टाकी २० हजारांना, ३ हजार लिटर्सची टाकी ३२ हजारांना आणि १२ हजार लिटर्सची टाकी ४० ते ५० हजार रुपयांना विक्री केली जात आहे. सहा टाक्या दिवसाकाठी विकल्या जातात. यातून विक्रेत्यांना १ लाख ८४ हजार रुपये मिळतात. ही उलाढाल एका दिवसाची आहे. पाणीटंचाई तीव्र झाल्यामुळे साठवणीचा प्रश्न निर्माण झाला. परिणामी, या वस्तूंचे भाव वधारले आहेत.

Web Title: Tanks, cans, barrels, and junkies sold loud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.