जिल्ह्यात टँकर वाढले
By Admin | Updated: April 27, 2015 01:00 IST2015-04-27T00:46:11+5:302015-04-27T01:00:11+5:30
लातूर : जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून, टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील ८८ गावांनी टँकरने पाणीपुरवठा

जिल्ह्यात टँकर वाढले
लातूर : जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून, टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील ८८ गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली असून, यापैकी ७७ प्रस्ताव दाखल झाले. पैकी ६० गावांचे प्रस्ताव मंजूर झाले असून, या गावांना ५५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
लातूर-१६, औसा-६, निलंगा-७, रेणापूर-४, अहमदपूर-१५, चाकूर-८, शिरूर अनंतपाळ-१, उदगीर-१८, देवणी-४, जळकोट-९ अशा एकूण ८८ गाव-वाड्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यापैकी लातूर-८, औसा-३, निलंगा-४, रेणापूर-३, अहमदपूर-११, चाकूर-७, उदगीर-१९, देवणी-२, जळकोट-३ अशा एकूण ६० गाव-वाड्यांना ५५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दररोज या गावांना १५८ फेऱ्या या टँकरद्वारे होत आहेत. जिल्ह्यातील ५७७ गाव-वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. या गावांवर अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. यापैकी ३९७ गाव-वाड्यांचे अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्यानुसार अधिग्रहणाची संख्या ५२५ वर गेली आहे. बोअर, विहिरींचा अधिग्रहणात समावेश आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तात्काळ पाणीपुरवठ्याच्या योजनाही टंचाई म्हणून राबविण्यात येत आहेत. नळदुरुस्ती, पूरक नळयोजना, विंधन विहिरी घेणे, बुडक्या घेणे, चर खोदणे आदी उपाययोजना करून पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन उपाययोजना करीत आहे. (प्रतिनिधी)