औरंगाबादच्या तनीषाने केले भारतीय संघातील स्थान निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:51 IST2017-12-02T00:50:39+5:302017-12-02T00:51:55+5:30
औरंगाबाद येथील उदयोन्मुख प्रतिभावान बुद्धिबळपटू तनीषा बोरामणीकर हिने पुणे येथे नुकत्याच झालेल्या ११ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले. या यशाबरोबरच तिने पुढील वर्षी थायलंड व स्पेन येथे होणाºया अनुक्रमे एशियन युथ आणि वर्ल्ड युथ बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारतीय संघातील स्थान निश्चित केले.

औरंगाबादच्या तनीषाने केले भारतीय संघातील स्थान निश्चित
औरंगाबाद : औरंगाबाद येथील उदयोन्मुख प्रतिभावान बुद्धिबळपटू तनीषा बोरामणीकर हिने पुणे येथे नुकत्याच झालेल्या ११ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले. या यशाबरोबरच तिने पुढील वर्षी थायलंड व स्पेन येथे होणाºया अनुक्रमे एशियन युथ आणि वर्ल्ड युथ बुद्धिबळ स्पर्धेसाठी भारतीय संघातील स्थान निश्चित केले.
पुणे येथे ११ फेºयांत झालेल्या या स्पर्धेत देशभरातील ३५0 स्पर्धक सहभागी झाले होते. १५२३ इंटरनॅशनल रेटिंग असणाºया तनीषाला या स्पर्धेत चौथे मानांकन देण्यात आले होते. तिने पहिल्या दोन फेºयांत उत्तर प्रदेशच्या आयुषी के. व दिल्लीच्या अनिष्का विक्रम यांचा सहज पराभव केला; परंतु तिसºया फेरीत तिला दिल्लीच्या कामया नेगी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला, तर आंध्र प्रदेशच्या वर्षिणी एम. हिच्याविरुद्धचा डाव तिने बरोबरीत सोडवला. तथापि, त्यानंतर तिने जबरदस्त मुसंडी मारताना गुजरातच्या विश्वा वासनवाला, आसामच्या नंदिका साहू, ओरिशाच्या साईरूपा पी., गोवा येथील अलिया व्हेला आणि तामिळनाडूच्या एस. मृदुभाषिणी यांच्याविरुद्ध विजय मिळवला. त्यानंतर १0 व्या फेरीत तिने तामिळनाडूच्या के. रत्नप्रिया व अखेरच्या फेरीत २0१६ च्या राष्ट्रीय विजेत्या सविता श्री यांना बरोबरीत रोखले. या स्पर्धेत तनीषाने ११ पैकी ८.५ गुणांसह तिसरे स्थान मिळवले. त्याचबरोबर तिने सलग तिसºयांदा भारतीय संघातील स्थान निश्चित केले. २0१३ मध्ये तनीषाने ७ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते, तर अहमदाबाद येथे २0१४ मध्ये ताश्कंद येथे झालेल्या एशियन युथमध्ये कास्यपदक जिंकले होते. त्याचप्रमाणे २0१५ मध्ये तिने अहमदाबाद येथील ९ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत भारतीय संघात स्थान मिळवले होते. तिला सतीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल तिचे औरंगाबाद जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आ. अतुल सावे, आॅल मराठी चेस असोसिएशनचे कार्यकारी विजय देशपांडे, सचिव हेमेंद्र पटेल, उपाध्यक्ष किशोर लव्हेकर आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.