तांदूळवाडीत चार घरे फोडली
By Admin | Updated: July 8, 2014 00:59 IST2014-07-07T23:25:23+5:302014-07-08T00:59:31+5:30
ईट : परंडा तालुक्यातील तांदूळवाडी येथे सोमवारी पहाटे चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातला़ एका दुकानासह चार ठिकाणी घरफोड्या करून रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले़

तांदूळवाडीत चार घरे फोडली
ईट : परंडा तालुक्यातील तांदूळवाडी येथे सोमवारी पहाटे चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातला़ एका दुकानासह चार ठिकाणी घरफोड्या करून रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले़ अनेक ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्नही चोरट्यांनी केला़ दागिन्यांसह रोख रक्कम असा जवळपास २२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे़
पोलिसांनी सांगितले की, चोरट्यांनी सोमवारी पहाटे तांदूळवाडी येथे पहाटेच्या सुमारास बबन भगवान खरसडे यांचे किराणा दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला़ गल्ल्यातील रोख ४ हजार रूपये व सॅमसंग कंपनीचा मोबाईल लंपास केला़ तेथून हे चोरटे अर्चना होगले यांच्या घरात घुसले़ होगले यांच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र व पेटीतील एक हजार रूपये व मुलांच्या पायातील चांदीच्या पट्ट्या चोरून नेले़ त्यानंतर भगवान धोंडीबा हवालदार यांच्या घरात घुसून खिशातील १५०० रूपये लंपास केले़ त्यानंतर चोरट्यांनी छाया खाडे यांच्या घरात घुसून त्यांच्या गळ्यातील पाच गॅ्रमचे मणीमंगळसूत्र व कानातील झुबे चोरून नेले़ याप्रकरणी बबन खरसडे यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूध्द अंबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोउपनि बी़जी़माळवदे, पोहेकॉ आऱएस़म्हेत्रे हे करीत आहेत़ दरम्यान, चोरट्यांनी सोमवारी पहाटे एकच धुमाकूळ घातल्याने अख्ख्या गावात दहशत पसरली आहे़ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत़ (वार्ताहर)
दारूविक्रेत्या सहा जणांविरुध्द कारवाई
उस्मानाबाद : जिल्ह्यात ठिकठिकाणी अवैधरीत्या दारूविक्री करणाऱ्या सहा जणाविरूध्द बेंबळी, ढोकी व शहर पोलिसांनी रविवारी कारवाई केली़ या कारवाईत ५५३० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ बेंबळी पोलिसांनी मेडसिंगा येथे भारत रामा पडवळ याच्याविरूध्द केलेल्या कारवाईत १००० रूपयांचा, केशेगाव शिवारात मंगल अशोक काळे हिच्याकडून १८१० रूपयांचा, केशेगाव येथील भास्कर दादाराव मस्के याच्याकडून १७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ शहर पोलिसांनी जुनाबसडेपो येथे मिनाबाई दगडू कांबळे याच्याकडून २०० रूपयांचा तर ढोकी पोलिसांनी तेर येथील सुनिल देवराव पवार याच्याकडून ८२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़