तामिळनाडूच्या कारखानदाराने फसविले
By Admin | Updated: November 23, 2014 00:23 IST2014-11-23T00:05:04+5:302014-11-23T00:23:11+5:30
चंदनझिरा : येथील नवीन मोंढा भागातील कापूस विक्रेते श्रीकांत फुलचंद भक्कड यांना २१ दिवसात कापसाचे पैसे देतो, असे

तामिळनाडूच्या कारखानदाराने फसविले
चंदनझिरा : येथील नवीन मोंढा भागातील कापूस विक्रेते श्रीकांत फुलचंद भक्कड यांना २१ दिवसात कापसाचे पैसे देतो, असे सांगून ३१९ क्विंटल ९५ किलो कापूस खरेदी करून फसवणूक केल्याबद्दल तामिलनाडू येथील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यस्थ म्हणून भूमिका बजावणारा मोहनराम (रा.तुतीकरण) याने मिनाक्क्षी टेक्सटाईलसाठी भक्कड यांच्याकडून ३१९ क्विंटल व ९५ कापसाच्या २०० गाठी खरेदी केल्या. रक्कम अदा करण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी भक्कड यांच्याकडून घेतला. कापसाची खरेदी २० सप्टेंबरला केल्यानंतर रक्कम अदा करण्यास मध्यस्थ मोहनराम व मिनाक्क्षी टेक्सटाईलचे मालक के. नागास्वामी यांनी टाळाटाळ सुरु केली. त्यामुळे भक्कड यांना संशय आला. पाठपुरावा केल्यानंतरही रक्कम पदरात न पडल्याने भक्कड यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. दरम्यान, चंदनझीरा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जमादार निवृत्ती शेळके यांनी दिली. अधिक तपास निरीक्षक महेंद्र जगताप करीत आहेत. (वार्ताहर)