तालुका कृषी अधिकारी चतुर्भुज
By Admin | Updated: June 15, 2014 00:34 IST2014-06-15T00:09:11+5:302014-06-15T00:34:32+5:30
नांदेड : शेती विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्याला ट्रॅक्टरची अवजारे देण्यासाठी साडेनऊ हजार रुपयांची लाच घेताना बिलोलीचे तालुका कृषी अधिकारी महमंद जहूर अहमद खॉन

तालुका कृषी अधिकारी चतुर्भुज
नांदेड : शेती विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्याला ट्रॅक्टरची अवजारे देण्यासाठी साडेनऊ हजार रुपयांची लाच घेताना बिलोलीचे तालुका कृषी अधिकारी महमंद जहूर अहमद खॉन यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे़
बिलोली येथील एका शेतकऱ्याला महाराष्ट्र शासनाच्या कोरडवाहू शाश्वत शेती विकास योजनेअंतर्गत ट्रॅक्टरची अवजारे देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी महमंद जहूर अहमद खॉन यांनी १७ हजार रुपयांची लाच मागितली होती़ अवजारे मिळाल्यानंतर साडेनऊ हजार रुपये देण्याचे ठरले होते़
याप्रकरणी तक्रारदार शेतकऱ्यांनी ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक पथकाला कळविली़ त्यानंतर शनिवारी तालुका कृषी चिकीत्सालय कासराळी येथे सापळा रचला़ यावेळी कृषी अधिकारी महमंद जहूर यांना साडे नऊ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले़ याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़ (प्रतिनिधी)