तालुका कृषी अधिकारी चतुर्भुज
By Admin | Updated: June 15, 2014 00:36 IST2014-06-15T00:09:11+5:302014-06-15T00:36:05+5:30
नांदेड : शेती विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्याला ट्रॅक्टरची अवजारे देण्यासाठी साडेनऊ हजार रुपयांची लाच घेताना बिलोलीचे तालुका कृषी अधिकारी महमंद जहूर अहमद खॉन

तालुका कृषी अधिकारी चतुर्भुज
लातूर : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क, पर्यटन आणि नवीन व नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री म्हणून समावेश झालेले अमित देशमुख यांच्या नागरी सत्कारानिमित्त शनिवारी लातुरात सर्वपक्षीय बैठक झाली़ लातूरच्या परंपरेला साजेसा नागरी सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला़
या बैठकीस राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष अॅड़ त्र्यंबकदास झंवर, जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष अॅड़ व्यंकट बेद्रे, महापौर प्रा़ स्मिता खानापूरे, जिल्हा बँकेचे चेअरमन एस़ आऱ देशमुख, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष मुर्तूजा खान, मनसेचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा़ बी़ व्ही़ मोतीपवळे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, जयंत काथवटे, रविंद्र पाठक, बाबुअप्पा सोलापूरे, रामदास पवार, ताजोद्दीन बाबा, अॅड़ जयश्री पाटील, चाँदपाशा इनामदार, मदन धुमाळ, सुभाष जाधव, नारायण लोखंडे आदींची उपस्थिती होती़
या सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळ्यास लोकनेते विलासराव देशमुख यांचे देश व राज्यातील सर्व मित्रांना निमंत्रित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला़ लोकनेते विलासराव देशमुख यांचे घनिष्ठ मित्र लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे अकाली निधन झाल्यामुळे राज्यमंत्री देशमुख यांचा नागरी सत्कार साधेपणाने परंतु, लातूरच्या परंपरेला साजेसा करण्याचा निर्णय घेण्यात आला़ (प्रतिनिधी)
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या देश व राज्यातील सर्व मित्रांना या समारंभासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे हा नागरी सत्कार साधेपणाने, परंतु लातूरच्या परंपरेला साजेसा करण्याचा संकल्प सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला.