लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील रस्त्यांवर मोबाईलवर बोलत चालकांकडून ‘सुसाट’ वाहन पळविण्याचे प्रकार होत आहेत. दुचाकी, चारचाकींबरोबर ‘एसटी’ आणि रिक्षाचालकांकडून हे धोकादायक प्रकार होत आहेत. या प्रकाराने वाहनातील प्रवाशांबरोबर रस्त्यावरील अन्य वाहनचालक, पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येत आहे. त्यामुळे अशा वाहनचालकांना कोण रोखणार? असा सवाल सर्वसामान्यांतून होत आहे.गोरखपूरपासून ५० किमी अंतरावरील कुशीनगरजवळ शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रेल्वेवर आदळल्याने १३ मुले व बसचालक असे १४ जण मृत्युमुखी पडले. बस चालविताना चालकाने गाणी ऐकण्यासाठी हेडफोन लावला होता. त्यातूनच हा दुर्दैवी अपघात घडला. शहरात एकीकडे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे, तर दुसरीकडे शहरातील रस्त्यावर मोबाईलवर बोलत, हेडफोन लावून वाहन चालविण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. वाहन चालविताना एखाद्याचा मोबाईलवर कॉल आला, तर चालक एका हाताने दुचाकीचे हॅण्डल, चारचाकीचे स्टेअरिंग आणि दुसºया हातात मोबाईल धरून वाहन चालविण्याची कसरत करतात. यामुळे रस्त्यावरून नजर हटते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
औरंगाबाद शहरातून मोबाईलवर बोलत चालक ‘सुसाट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:09 IST
शहरातील रस्त्यांवर मोबाईलवर बोलत चालकांकडून ‘सुसाट’ वाहन पळविण्याचे प्रकार होत आहेत. दुचाकी, चारचाकींबरोबर ‘एसटी’ आणि रिक्षाचालकांकडून हे धोकादायक प्रकार होत आहेत. या प्रकाराने वाहनातील प्रवाशांबरोबर रस्त्यावरील अन्य वाहनचालक, पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येत आहे.
औरंगाबाद शहरातून मोबाईलवर बोलत चालक ‘सुसाट’
ठळक मुद्देकोण रोखणार? : एसटी, रिक्षाचालकांचीही बेपर्वाई