जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तळीरामांचा "विसावा"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:30 IST2020-12-17T04:30:17+5:302020-12-17T04:30:17+5:30
औरंगाबाद: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दोन वर्षांपासून बंद असलेले ''विसावा'' उपाहारगृह पडीक वास्तूत बदलले असून सध्या तेथे तळीरामांचा ''विसावा'' वाढला ...

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तळीरामांचा "विसावा"
औरंगाबाद: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दोन वर्षांपासून बंद असलेले ''विसावा'' उपाहारगृह पडीक वास्तूत बदलले असून सध्या तेथे तळीरामांचा ''विसावा'' वाढला आहे.
जिल्हा प्रशासनाचे उत्पन्नाचे हे साधन असून दुर्लक्षामुळे तेथे कचरा, रिकाम्या बाटल्या पडून आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकारी, कर्मचारी आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी २०१२ साली उपाहारगृह बांधले होते. २०१८ पर्यंत हे उपाहारगृह सुरळीत चालले. त्यानंतर अचानक बंद पडले. उपाहारगृह बंद केल्याने आता जिल्हाधिकारी कार्यालय आवारात चहा, फराळ, नाश्ता, जेवणाची सोय राहिलेली नाही. लॉकडाऊनमध्ये सर्व हॉटेल्स बंद होते. त्या काळात विसावा सुरू करण्याचा निर्णय झाला नाही. हे उपाहारगृह का बंद करण्यात आले, याबाबत माहिती घेतली असता सूत्रांनी सांगितले, प्रशासकीय कारणामुळे ते बंद करण्यात आले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ती जागा मात्र तळीरामांचा अड्डा होऊ लागली आहे.