शासनाच्या योजनेचा लाभ घेत, औरंगाबादेत पाहिले खरेदीखत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:02 IST2021-04-07T04:02:12+5:302021-04-07T04:02:12+5:30
राज्य शासनाने महिलांसाठी दिलेल्या एक टक्का स्टॅम्प ड्युटी सवलतीचा फायदा घेऊन औरंगाबाद जिल्ह्यामधील पहिला दस्त कार्यालय क्रमांक ...

शासनाच्या योजनेचा लाभ घेत, औरंगाबादेत पाहिले खरेदीखत
राज्य शासनाने महिलांसाठी दिलेल्या एक टक्का स्टॅम्प ड्युटी सवलतीचा फायदा घेऊन औरंगाबाद जिल्ह्यामधील पहिला दस्त कार्यालय क्रमांक २ येथे नोंदणी करण्यात आला. त्याबद्दल संबंधित महिलांचा सत्कार करण्यात आला. औरंगाबाद शहरातील हर्सुल येथे प्लॉट नंबर ४४ मध्ये सुनीता विजय भोसले व हिराबाई विष्णू भोसले यांच्या नावाने नवीन राहते घर विकत घेण्यात आले. विशेषतः हे घर दोन्ही महिलांच्या नावाने विकत घेतले. यावेळी मुद्रांक उपनियंत्रक सोहम वायाळ व इतर कर्मचारी हजर होते. १ एप्रिलपासून जाहीर केलेल्या या सवलतीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सोहम वायाळ यांनी केले आहे.
-------------------------------------------------------------
फोटो
घर खरेदी करणाऱ्या सुनीता भोसले, हिराबाई भोसले, नोंदणी अधिकारी कविता कदम यांचे स्वागत करताना मुद्रांक उपनियंत्रक सोहम वायाळ.