सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:04 IST2021-05-07T04:04:06+5:302021-05-07T04:04:06+5:30
शहरात लपून छपून गुटका व सुगंधित तंबाखूची विक्री सुरू असल्याने मास्क बाजूला सारून रस्त्यावरच पचापच थुंकणाऱ्याचे प्रमाणही दिवसेंदिवस ...

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करा
शहरात लपून छपून गुटका व सुगंधित तंबाखूची विक्री सुरू असल्याने मास्क बाजूला सारून रस्त्यावरच पचापच थुंकणाऱ्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. काही दुचाकी वाहनधारक मागील वाहनधारकांचा कसलाही मुलाहिजा न बाळगता मास्क खाली ओढून थुंकत असतात. त्यामुळे थुंकीचे सूक्ष्म तुषार हवेवाटे मागील वाहनधारकांच्या नाका-तोंडावर उडतात. मग कोरोनाला कसा आळा बसेल? अनपेक्षित थुंकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई झाल्याचे सध्या तरी ऐकिवात नाही. जोपर्यंत प्रशासनाकडून थुंकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई होणार नाही तोपर्यंत रस्त्यावर पचापच थुंकणाऱ्यांवर वचक बसणार नाही, असे मत समाधान देशमुख, जगन्नाथ लहाने, प्रा.अनिल लहाने, डॉ.रामदास वनारे, प्रा.अर्जुन तायडे, भिकन शिंपी, अनंत तोताडे, ॲड. नितीन सोनवणे पाटील, साहेबराव पाटील, शशिकांत सोनवणे पाटील, प्रा. वीरेंद्र सोनवणे पाटील, डॉ.सुधीर लहाने, डॉ.राजाभाऊ टेकाळे, योगेश निंबोणे, योगेश्वर निकम व अश्विनी पुंडकर, गीता जाधव यांनी व्यक्त केले आहे.