दौरे करण्यापेक्षा उपाययोजना करा
By Admin | Updated: November 27, 2014 01:10 IST2014-11-27T01:04:21+5:302014-11-27T01:10:06+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला

दौरे करण्यापेक्षा उपाययोजना करा
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. दुष्काळासंबंधी नुसती वक्तव्ये करण्यापेक्षा उपाययोजना करा, असा सल्लाही त्यांनी खडके यांना दिला. केवळ दौरे करून दुष्काळ दूर होणार नाही, त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या लागतील, असा टोला यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
राज मंगळवारपासून औरंगाबाद दौऱ्यावर असून त्यांनी आज बैठकीपूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांकडे मोबाईल फोनचे बिल भरायला पैसे आहेत, मग वीज बिल का भरत नाहीत, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला होता. त्याविषयी ठाकरे म्हणाले, दुष्काळाच्या काळात खडसे यांनी असे विधान करणे योग्य नाही. सध्या दुष्काळग्रस्तांना दिलासा देणे गरजेचे आहे; पण त्याऐवजी माध्यमांना काही तरी वेडेवाकडे बोलून त्यांचे लक्ष विचलित करण्याचे काम केले जात आहे.