शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

नव्या विमानसेवेच्या ‘टेकआॅफ’कडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:41 IST

स्पाईस जेटकडून औरंगाबादहून सकाळी आणि सायंकाळी मुंबई, दिल्लीसाठी विमानसेवा सुरूकरण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती पार पडल्या आहे. नव्या विमानसेवेची तयारी अंतिम टप्प्यात असून, या कंपनीकडून अधिकृत घोषणा आणि वेळापत्रकाकडे विमानतळ प्राधिकरणाचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देस्पाईस जेटची तयारी अंतिम टप्प्यात : जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती

औरंगाबाद : स्पाईस जेटकडून औरंगाबादहून सकाळी आणि सायंकाळी मुंबई, दिल्लीसाठी विमानसेवा सुरूकरण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखती पार पडल्या आहे. नव्या विमानसेवेची तयारी अंतिम टप्प्यात असून, या कंपनीकडून अधिकृत घोषणा आणि वेळापत्रकाकडे विमानतळ प्राधिकरणाचे लक्ष लागले आहे.चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला २७ जून रोजी जेटच्या अधिकाºयांनी भेट देऊन सोयीसुविधा आणि प्रवासी क्षमतेचा आढावा घेतला. या कंपनीने जेट एअरवेजच्या माजी कर्मचाºयांच्या मुलाखतीही घेतल्या. त्यामुळे जेट एअरवेजचे कर्मचारी स्पाईस जेटची धुरा सांभाळणार असे दिसते. यामुळे लवकरच स्पाईस जेटकडून औरंगाबादहून विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळाले. शिवाय या कंपनीकडून आॅगस्टमध्ये विमानसेवा सुरूहोणार असल्याचे खा. इम्तियाज जलील यांनी एका कार्यक्रमात सांगितले.स्पाईस जेटकडून दिल्ली, मुंबईसाठी विमानसेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत. तीन महिन्यांपूर्वी जेट एअरवेजचे सकाळ आणि सायंकाळचे विमान बंद झाल्याने औरंगाबादच्या हवाई कनेक्टिव्हिटीला मोठा फटका बसला. त्याचा विविध क्षेत्रांवर मोठा परिणाम जाणवत आहे. औरंगाबाद शहर सध्या एअर इंडिया आणि ट्रू जेट कंपनीमुळे मुंबई, दिल्ली आणि हैदराबादला हवाई सेवेने जोडलेले आहे.गेल्या महिनाभरात औरंगाबादहून नवीन विमानसेवा सुरूहोण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. एकाच वेळी अनेकांकडून पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे दिसते; परंतु यासंदर्भात चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाला अद्यापही कंपनीकडून अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.एकत्रित प्रयत्नाने यशविमानसेवा सुरूकरण्यासाठी गेल्या काही दिवसांत एकत्रित प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे स्पाईस जेट विमान कंपनीची विमानसेवा सुरूहोत असल्याचे दिसते, असे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ