मराठा आरक्षणासाठी धरणे

By Admin | Updated: May 27, 2014 00:56 IST2014-05-27T00:54:41+5:302014-05-27T00:56:36+5:30

परभणी: मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे तसेच कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी देऊन गरजूंना कर्ज वाटप करण्यास सुरुवात करावी,

To take care of Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी धरणे

मराठा आरक्षणासाठी धरणे

परभणी: मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे तसेच कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी देऊन गरजूंना कर्ज वाटप करण्यास सुरुवात करावी, या मागणीसाठी २ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर ४ जून रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन केले जाणार आहे. मराठा समन्वय समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात सर्व समविचारी संघटना तसेच मराठा बांधवांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन मराठवाडा अध्यक्ष धाराजी भुसारे यांनी केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले. यापुढे असे दुर्लक्ष होऊ नये, नियमाप्रमाणे व कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊन इतर प्रांतात ज्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण आहे, त्याप्रमाणे आरक्षण द्यावे, कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाची स्थापना राज्यातील सर्वसाधारण गटातील नागरिकांना लवकर कर्ज मिळावे, या उद्देशाने झाली. परंतु, शासनाने या महामंडळाला निधीच पुरविला नाही. त्यामुळे महामंडळ नावालाच राहिले आहे. आता या महामंडळास निधी देऊन गरजू लोकांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी आहे. या मागणीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात २ जून रोजी आणि मुंबई येथे ४ जून रोजी धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन भुसारे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: To take care of Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.