आगारप्रमुखाच्या निवासस्थानाने घेतला मोकळा श्वास

By Admin | Updated: July 4, 2014 00:10 IST2014-07-04T00:04:09+5:302014-07-04T00:10:59+5:30

उद्धव चाटे , गंगाखेड शहरातील बसस्थानकातील आगारप्रमुखांचे निवासस्थान परिसराला वेड्या बाभळीने विळखा घातला होता.

Take breathing with the residence of the head of the house | आगारप्रमुखाच्या निवासस्थानाने घेतला मोकळा श्वास

आगारप्रमुखाच्या निवासस्थानाने घेतला मोकळा श्वास

उद्धव चाटे , गंगाखेड
शहरातील बसस्थानकातील आगारप्रमुखांचे निवासस्थान परिसराला वेड्या बाभळीने विळखा घातला होता. त्यामुळे चार ते पाच वर्षांपासून ही निवासस्थाने बंद होती. परंतु या वेड्या बाभळी काढून टाकल्याने निवासस्थानाने मोकळा श्वास घेतला आहे.
गंगाखेड आगाराची स्थापना १९८१ साली झाली होती. या आगारात ३११ कर्मचारी काम करतात. गेल्या काही वर्षांपासून आगारप्रमुखांच्या निवासस्थानाकडे दुर्लक्ष झाल्याने ही निवासस्थाने बंद होती.
नवीन आगारप्रमुख काळम पाटील यांनी निवासस्थान परिसरातील वेड्या बाभळी व कचऱ्याची साफसफाई करून निवासस्थानाचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे आता या निवासस्थानात कर्मचारी वास्तव्य करण्यास येऊ लागले आहेत. त्यामुळे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अपेक्षा वाढल्या
नवीन आगारप्रमुख काळम पाटील यांच्याकडून प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. काळम यांनी बसस्थानक परिसर स्वच्छ व सुंदर करणे गरजेचे आहे. तसेच बसस्थानकातील संत जनाबाई मंदिराचा जिर्णोद्धार, स्वच्छ पिण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Take breathing with the residence of the head of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.