मराठा आरक्षण लढ्यातील गुन्हे मागे घ्या

By Admin | Updated: July 20, 2014 00:27 IST2014-07-20T00:13:52+5:302014-07-20T00:27:40+5:30

श्रीनिवास भोसले, नांदेड मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या सामाजिक कार्यासाठी गत अनेक वर्षांपासून लढा सुरू होता़

Take back crime against Maratha reservation fight | मराठा आरक्षण लढ्यातील गुन्हे मागे घ्या

मराठा आरक्षण लढ्यातील गुन्हे मागे घ्या

श्रीनिवास भोसले, नांदेड
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या सामाजिक कार्यासाठी गत अनेक वर्षांपासून लढा सुरू होता़, परंतु या लढ्यात शेकडो कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केली़
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन निर्णयानुसार शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (ईएसबीसी) या नावाचा नवीन प्रवर्ग तयार केला आहे़ यानुसार मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळाले असून याचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाने मराठा जात प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे़ महाराष्ट्रातील पहिले प्रमाणपत्र हिंगोली जिल्ह्यात देण्यात आले, असे आखरे यांनी सांगितले़
शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मध्ये विविध वर्गाच्या प्रवेशाकरिता मराठा आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी हिंगोली जिल्ह्याप्रमाणे इतर जिल्ह्यातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी तत्परता दाखवून सहकार्य करावे, असे आवाहन मनोज आखरे यांनी केले़
हिंगोली जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी, तहसीलदार विद्याचरण कडवकर, लिपिक स्वप्निल जाधव यांच्या तत्परतेमुळे एकूण १५ विद्यार्थ्यांना मराठा जात प्रमाणपत्र तत्काळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले़ माझ्या जिल्ह्यातून पहिले प्रमाणपत्र मिळल्याचा आपणास आनंद आहे, असे मनोज आखरे म्हणाले़ तसेच जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे कुठून आणि कशी काढावी, याविषयी गावागावात जनजागृती करण्याच्या सूचना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले़ तंत्रशिक्षण संचालनाल यांच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षणाचा उल्लेख केलेला नाही़ परंतु, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी १६ टक्के आरक्षणानुसार या दोन्ही वर्गात प्रवेश मिळतील़ त्या विभागाने तशी अधिसूचना काढली असून विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा़
एमबीबीएस, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन यासह सर्व शाखांमध्ये आरक्षणानुसार प्रवेश मिळावेत, असे आखरे म्हणाले़
ओबीसीसाठी लढा सुरूच राहणार
मराठा समाजास राज्य शासनाने १६ टक्के आरक्षण दिले आहे़ परंतु या आरक्षणाचा आयआयटी, युपीएससी परीक्षा आदी ठिकाणी केंद्रात लाभ मिळणार नाही़ त्यासाठी मराठा समाजाचा ओबीसीमध्ये सरसकट समावेश होणे गरजेचे आहे अथवा स्वतंत्र दर्जा मिळणे आवश्यक आहे़ त्यामुळे ओबीसीत समावेशासाठी आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे आखरे यांनी सांगितले़
येथे मिळणार आरक्षणाचा लाभ़़़
सर्व शासकीय व खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये शिक्षण, कृषी शिक्षण या विभागाअंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी आरक्षणाचा लाभ मिळणार आहे़
मराठा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला
जातीचा दाखला
नॉन क्रिमीलेयर दाखला
जातवैधता प्रमाणपत्र

Web Title: Take back crime against Maratha reservation fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.