बौद्ध म्हणून ६० वर्षांचे सिंहावलोकन करा
By Admin | Updated: October 13, 2016 01:10 IST2016-10-13T00:32:27+5:302016-10-13T01:10:35+5:30
औरंगाबाद : रक्ताचा एक थेंबही न सांडता नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म अनुप्रवर्तन घडवून आणल्याने जगात मोठी धम्मक्रांतीच झाली आहे

बौद्ध म्हणून ६० वर्षांचे सिंहावलोकन करा
औरंगाबाद : रक्ताचा एक थेंबही न सांडता नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म अनुप्रवर्तन घडवून आणल्याने जगात मोठी धम्मक्रांतीच झाली आहे. बौद्ध म्हणून ६० वर्षांचे सिंहावलोकन करा, असे आवाहन पूज्य भदन्त करुणानंद थेरो यांनी अध्यक्षीय समारोपप्रसंगी केले.
धम्मरत्न मित्रमंडळातर्फे आयोजित अशोक विजयादशमी तथा धम्मदीक्षा षष्ठी समारंभात हडको येथे ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.राजेश रगडे होते. पूज्य भिक्खू सुगत बोधी थेरो यांनी धम्मदेसना दिली. कार्यक्रमास दौलत खरात, लक्ष्मण मगरे, राजू खरे, व्ही. के. वाघ, डॉ. रतन वाघ, दिलीप रगडे, मगन खंडाळे, पंडित बोर्डे, राजेश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बुद्ध धम्म विज्ञानावर आधारित आणि भारतीय मातीतील असल्याने बुद्धापासून सम्राट अशोकासह सखोल माहिती उदाहरणासह देऊन बौद्ध धम्माचे चक्र कसे अनुप्रवर्तित झाले हे त्यांनी समजावून दिले. जो कुणी कर्मकांड सोडून बौद्ध धम्माचे आचरण करील, ती व्यक्ती मोठी बनेल असेही ते म्हणाले. डॉ. राजेश रगडे यांनी विदेशातील बुद्ध धम्मातील स्थळांची माहिती देऊन उपासकांनी भिक्खू संघाला सोबत घेऊन बौद्धांची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी धम्म यात्रा काढावी. स्वत:च्या मुलाचे नाव बौद्ध संस्कृतीतील ठेवावे, घरातदेखील वास्तुकलेत बौद्ध संस्कृती असावी, त्यामुळे कुटुंबही बौद्धमय वातावरणात घडेल, असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ पाखरे यांनी केले. सुनील खरात यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धम्मरत्न मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप रगडे, मिलिंद दाभाडे, यशवंत दाभाडे, प्रकाश कंकाळ, रमेश वानखेडे, उत्तमराव जाधव, भगवान गवई, विलास पांडे, बी. डी. सूर्यवंशी, सिद्धार्थ चोरपगार, प्रकाश पाखरे, सुमित ढोके, संतोष सोनवणे, वामनराव कांबळे, मिलिंद पातारे आदींनी परिश्रम घेतले.