आरटीओंकडून २२ वाहनांवर करवाई

By Admin | Updated: July 15, 2016 00:45 IST2016-07-15T00:19:13+5:302016-07-15T00:45:04+5:30

जालना: खाजगी वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २२ वाहनांवर आरटीओंच्या विशेष पथकाने गुरूवारी कारवाई केली. यात दीड लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

Take 22 vehicles from RTO | आरटीओंकडून २२ वाहनांवर करवाई

आरटीओंकडून २२ वाहनांवर करवाई


जालना: खाजगी वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २२ वाहनांवर आरटीओंच्या विशेष पथकाने गुरूवारी कारवाई केली. यात दीड लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार १४ ते २१ जुलै दरम्यान विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईसोबतच प्रवाशांना अवैध प्रवासी वाहतुकीमुळे कसे अपघात होतात याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. गुरूवारी दुपारी जालना तालुक्यासह अंबड, घनसांवगी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर अवैध प्रवासी वाहतूक करणारे क्रुझर, अ‍ॅपे व इतर वाहनांवर कारवाई करण्यात आली. चार स्कूलबसवर जादा विद्यार्थी बसविल्यामुळे त्यांचावर कारवाई करण्यात आली. एका बसमध्ये २० ते २५ विद्यार्थी बसविण्यात आले होते. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आढळून आले. या मोहिमे दरम्यान अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
यात वाहनांचे नोंदणी निलंबन, वाहन जप्त करणे,दंड वसूल आदी कारवाई करण्यात येत आहे. गुरूवारी झालेल्या कारवाईत बहुतांश वाहनांमध्ये क्षमतपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी प्रवास करत होते. ही कारवाई एआरटीओ ए.क्यू. खान यांच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वर काटकर यांनी कारवाई केली. (वार्ताहर)

Web Title: Take 22 vehicles from RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.